मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – माझ्या बंधुंना ईडीची नोटीस आली आहे, एका कंपनीबाबत त्यांना माहिती विचारण्यात आली. चार दिवसांपूर्वीच ते जाऊन आले. ईडीला आवश्यक ती माहिती दिली. त्याचा आणि कालच्या भेटीचा संबंध लावण्याची गरज नाही असे स्पष्टीकरण राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिले. पुण्यात उद्योगपती अतुल चोरडिया यांच्या निवासस्थानी शरद पवार, अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यात गुप्त भेट झाली. त्यामुळे या भेटीचा व ईडीच्या नोटीसा संबध असल्याची चर्चा होती. त्यावर जयंत पाटील यांनी आज स्पष्टीकरण दिले.
यावेळी ते म्हणाले की, ती गुप्तबैठक नव्हतीच ती. मी पवारसाहेबांसोबत गेलो आणि मी तिथून निघून आलो. बैठकीत काय झाले हे मला माहित नाही. बातम्या पेरल्या जातात असं मला वाटत. आता हे कोण करत आहे ते तुम्हीच हुडकून काढा. माझी भूमिका मी याआधीच स्पष्ट केली. ईडी आणि गुप्तभेटीचा काही संबंध नाही.
यावेळी एका प्रश्नाला उत्तर देतांना ते म्हणाले की, कार्यकर्त्यांच्या मनात संभ्रम होण्याचा प्रश्न नाही. लोक एकमेकांना भेटत असतात. विशेष सांगण्याची आवश्यकता आहे, असं मला वाटत नाही. यावेळी त्यांनी राष्ट्रवादीत फूट कुठे पडली असे सांगितेल. सगळेच शरद पवार यांचा फोटो लावतात. सगळेच आम्ही शरद पवारांसाठी काम करतोय असे सांगतात, त्यामुळे अजून तरी फूट नजरेत नाही, त्यामुळे शरद पवारांनी निवडणूक आयोगाला कळवले असल्याचेही जयंत पाटील यांनी सांगितले.
jayant patil