मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील मुंबईतील ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कॅबिनेट बैठक सुरु असतांनाच त्यांना त्रास सुरु झाला. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णलायत तपासणी झाल्यानंतर जयतं पाटील यांनी ट्विटरवरून प्रकृती स्थिर असल्याची माहिती दिली. यात त्यांनी म्हटले आहे की,आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने माझी प्रकृती अत्यंत उत्तम आहे. काळजी करण्याचे कारण नाही. नियमित तपासणीसाठी मी रुग्णालयात गेलो होतो. डॉक्टरांनी मला विश्रांती घेण्याची सुचना केली आहे. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. मी लवकर पुन्हा आपल्या सेवेत रुजू होईल.
आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने माझी प्रकृती अत्यंत उत्तम आहे. काळजी करण्याचे कारण नाही. नियमित तपासणीसाठी मी रुग्णालयात गेलो होतो. डॉक्टरांनी मला विश्रांती घेण्याची सुचना केली आहे. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. मी लवकर पुन्हा आपल्या सेवेत रुजू होईल. धन्यवाद!
— Jayant Patil- जयंत पाटील (@Jayant_R_Patil) July 28, 2021