सातारा (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर नग्न फोटो पाठवल्याचा आरोप करणा-या महिेलेला खंडणी प्रकरणात सातारा पोलिसांकडून अटक केली आहे. सदर प्रकरण मिटवण्यासाठी ३ कोटी रुपयांची मागणी केली होती. यामध्ये १ कोटी खंडणीची रक्कम स्वीकारताना महिलेला पोलिसांनी अटक केली. सातारा स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली.
सातारा जिल्हयातील माण – खटाव मतदार संघाचे आमदार जयकुमार गोरे यांनी २०१६ पासून फक्त सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या घराण्यातील वारस असल्यानेच आपल्याला त्रास दिल्याचा आरोप महिलेने केला होता. त्यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी या प्रकरणाची माहिती सर्वांना दिली होती. ही महिला येत्या काही दिवसात विधान भवनसमोर उपोषणला बसणार असल्याचा दावाही त्यांनी केला होता.
मंत्री विवस्त्र फोटो महिलेला पाठवतो. १० दिवस जेलची हवा खाऊन येतो. तसेच १० हजार रुपयांचा न्यायालयाचा दंड भरतो. आणि पुन्हा महिलेला ब्लॅकमेल करायला लागतो असा आरोप विरोधी पक्षांनी केला होता. पण, आता ही महिलाच खंडणी प्रकरणात सापडली आहे.