इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
राष्ट्रवादीच्या फुटीनंतर पवार कुटुंब दुभंगले. त्यानंतर लोकसभा व विधानसभा निवडणुकीत संघर्ष आणखी वाढला. पण, त्यानंतर आता त्यांच्यातील संघर्ष काहीसा कमी होतांना दिसत आहे. त्यात आता पवारांच्या घरी मंगलकार्य निघाले असून त्यामुळे पवार कुटुंबिय पुन्हा एकत्र दिसणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव जय पवार यांचे लग्न ठरले असून १० एप्रिलला साखरपुडा आहे. या साखरपुड्यापूर्वी त्यांनी शरद पवार यांच्या निवासस्थानी जाऊन आशीर्वाद घेतला. त्यावेळी त्यांची भावी पत्नी ऋतुजा पाटीलही बरोबर होती.
खासदार सुप्रिया सुळे यांनी या भेटीचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यानंतर सर्वांचे लक्ष वेधले गेले. १० एप्रिलला साखरपुडा पुण्यात होणार आहे. सोशल मीडिया कंपनी सांभाळणारे प्रवीण पाटील यांची मुलगी ऋतुजा पाटील हिच्यासोबत हा साखरपुडा पार पडणार आहे.