इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मुंबईतील जय जवान गोविंदा पथकाने शनिवारी तीनवेळा १० थर रचून नवा विश्वविक्रम प्रस्थापित केला आहे. पण, या पथकाच्या यशावरुन आता
राजकारण चांगलेच पेटले आहे. वरळीतील मराठी मेळाव्यात सलामी दिल्यामुळे जय जवान गोविंदा पथकाला मंत्री प्रताप सरनाईक व पूर्वेश सरनाईक यांच्याकडू आयोजित प्रो – गोविंदा स्पर्धेतून जाणीवपूर्वक वगळले. त्यामुळे राजकीय कलगीतुरा रंगला. कालही कोकण गोविंदा पथकाने १० थर रचून विश्वविक्रम प्रस्थापिक केला. या यशानंतर प्रताप सरनाईक यांनी जय जवान पथकाला अप्रत्यक्ष टोला लगावला.
त्यानंतर मनसेचे नेते राजू पाटील यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट टाकत सरनाईक पितापुत्रांना सुनावले. त्यांनी म्हटले की, मराठी माणसांच्या मेळाव्यात दोन्ही ठाकरे बंधूंना ‘जय जवान दहिहंडी पथक’ या पथकाने मराठी माणसांचे आशास्थान म्हणून सलामी दिली होती. याचाच राग धरून काही भैय्यांची तळी उचळणारे गांडूळ वळवळले होते व आकसापोटी त्यांना एका स्पर्धेत प्रवेश नाकारण्याचा नीच राजकारण केले होते. आज पण ठाण्यात एका गोविंदा पथकाने ‘त्यांच्या’ इथे पहिल्यांदा १० थर लावले, त्या गोविंदा पथकाचे मनापासून अभिनंदन केलेच पाहिजे. परंतु इथेही यांच्या राजकारणाचे गांडूळ वळवळले व या विजयी पथकाचा नामोल्लेख करताना अप्रत्यक्ष जय जवान गोविंदा पथकाला टोला मारला.
आज त्याच जय जवान गोविंदा पथकाने एकदा नाही चक्क तीन वेळा १० थर लावून एकाच दिवसात हॅट्रिक मारली व या गांडूळांना माती दाखवली. जय जवान गोविंदा पथकातील सर्व मित्रांचे व त्यांच्या पाठी खंबीरपणे उभा राहणाऱ्या आमच्या अविनाश जाधवांचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.संस्कार व ‘संस्कृती’ ही वागण्यात असली पाहिजे……नुसत्या नावात काय आहे ?