इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – परदेश व्यापार महासंचालनालयाचे संयुक्त संचालक जवरीमल बिश्नोई आत्महत्याप्रकरणाला नवे वळण आले आहे. या प्रकरणाशी संबंधित एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्या व्हिडिओमुळे पुढे आलेल्या माहितीनुसार, घराच्या खिडकीतून नोटांच्या बंडलांनी भरलेली बॅग खाली पडताना दिसून येत आहे. नोटांनी भरलेली ही बॅग जवरीमलच्या पत्नीने फेकली असून खाली उभा असणारा तरुण जवरीमलचा भाचा आहे.
जवरीमल बिश्नोई यांना शुक्रवारी सीबीआयने लाचखोरी प्रकरणात अटक केली होती. यानंतर शनिवारी कार्यालयाची झडती घेत असताना जवरीमल यांनी चौथ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. त्यांचा भाऊ संजय कुमार आणि मित्र अभिषेक मिश्रा यांनी सीबीआय अधिकाऱ्यांनी त्यांची हत्या केल्याचा आरोप केला आहे. दुसरीकडे जिल्हास्तरीय अधिकाऱ्याच्या उपस्थितीत शवविच्छेदन झाल्यानंतर कुटुंबीय बिश्नोई यांचा मृतदेह ताब्यात घेण्याच्या तयारीत होते.
दरम्यान, सीबीआयने पन्नास लाख रुपयेही जप्त केले आहेत. सीबीआय अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या दिवशी अटक करण्यात आली त्याच दिवशी घराची झडती घेण्यात येत होती. बिश्नोई यांच्या पत्नीने पैशांचे काही बंडल घराच्या बाल्कनीतून खाली फेकले. बिष्णोई यांच्या भाच्याने हे पैसे खाली जमा केले. हा व्हिडिओ शुक्रवारी रात्री १०.४२ वाजताचा आहे. बिश्नोई यांच्याकडे एवढी रोकड कुठून आली याचा शोध घेतला जात आहे.
५ लाख घेताना रंगेहात अटक
सीबीआयला जवरीमलच्या लाचखोरीविषयी तक्रार प्राप्त झाली होती. त्यानुसार, केंद्रीय तपास यंत्रणेने कारवाईसाठी सापळा रचला. शुक्रवारी बिश्नोई यांना ५ लाखांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले. हे प्रकरण एका व्यापाऱ्याची ५० लाख रुपयांची बँक गॅरंटी माफ करण्यासंबंधीचे होते.
?जळगावातील धक्कादायक प्रकार! *अवघ्या दीड वर्षांच्या बाळाला ४ दिवसात ४ इंजेक्शन…*
अखेर बाळाचा मृत्यू..
डॉक्टरवर गुन्हा दाखल https://t.co/eN61aFn4rJ#indiadarpanlive #jalgaon #crime #small #baby #death #injections #doctor #fir— India Darpan Live (@IndiaDarpanLive) March 27, 2023
Javerimal Bishnoi Bribe Corruption Video 50 Lakh