इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांनी आपलाच मुलावर मोठी कारवाई केली आहे. त्याची सध्या जगभरात मोठी चर्चा होत आहे. त्यांचा मोठा मुलगा शोतारो किशिदा याने पंतप्रधान निवासस्थानाचा गैरवापर झाल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.
जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांनी सांगितले की, त्यांचा मुलगा कार्यवाहक धोरण सचिव म्हणून राजीनामा देत आहे. तसेच, पंतप्रधानांचे निवासस्थान खाजगी पार्टीसाठी वापरण्याची जबाबदारी आम्ही घेत आहोत. त्याच अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे.
पंतप्रधानांच्या निवासस्थानी झालेल्या खासगी पार्टीचे फोटो एका मासिकाने प्रसिद्ध केले. त्यानंतर संताप उसळला. विरोधकांनीही सत्ताधारी सरकारला धारेवर धरले. जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांचा मोठा मुलगा आणि राजकीय घडामोडींसाठी त्यांचे कार्यकारी सचिव शोतारो किशिदा यांनी ३० डिसेंबर २०२२ रोजी पंतप्रधानांच्या अधिकृत निवासस्थानी नातेवाईकांसह काही जणांना पार्टीसाठी आमंत्रित केले होते.
पंतप्रधानांच्या निवासस्थानातील पार्टीचे फोटो साप्ताहिक शुकन बनशुन मासिकाने प्रकाशित केले. यामध्ये नवनियुक्त मंत्रिमंडळाप्रमाणेच पंतप्रधानांच्या मुलाला आणि त्यांच्या नातेवाईकांना रेड कार्पेटवर दाखवण्यात आले. किशिदा यांनी सोमवारी रात्री पत्रकारांना सांगितले की, “राजकीय व्यवहार सचिव म्हणून त्यांची कृती अयोग्य होती आणि मी त्यांना जबाबदार धरून त्यांची बदली करण्याचा निर्णय घेतला आहे.” ते म्हणाले की त्यांच्या मुलाच्या जागी गु ताकायोशी यामामोटो हे सचिव म्हणून नियुक्त होतील. किशिदाने कबूल केले की त्यांनी पाहुण्यांचे थोडक्यात स्वागत केले परंतु ते म्हणाले की ते डिनर पार्टीमध्ये राहिले नाहीत.
Japan PM Fumio Kishida Action on Son