टोकियो – जागतिक ऑलम्पिक स्पर्धा होत असतानाच जपानमध्ये हाहाकार सुरू झाला आहे. त्याची गंभीर दखल घेत जपानमध्ये आणीबाणी घोषित करण्यात आली आहे. मोठ्या हिंमतीने ऑलिम्पिक स्पर्धेचे आयोजन करणाऱ्या जपानमध्ये सध्या कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहेत. जपान मेडिकल असोसिएशनच्या प्रमुखांनी तीव्र चिंता व्यक्त करत देशव्यापी आणीबाणी लागू केली आहे. एखाद्या भयानक आगीप्रमाणे पसरणाऱ्या या संसर्गावर नियंत्रण कसे मिळवावे, या विवंचनेत सरकार व प्रशासन आहे. तर, हॉस्पिटलमध्ये बेडच्या उपलब्धतेवरही मोठा परिणाम झाला आहे.
जपान मेडिकल असोसिएशनचे (जेएमएचे) अध्यक्ष तोशिओ नाकागावा यांनी आणीबाणीची केलेली घोषणा अखेर पंतप्रधान योशीहिदे सुगा यांच्या आदेशानंतर अंमलात आली आहे. कोविड -१९ चे रुग्ण जे गंभीर आजारी आहेत किंवा ज्यांची प्रकृती गंभीर असल्याचा संशय आहे. फक्त त्यांना रुग्णालयात दाखल केले जाईल. इतरांना घरी अलिप्त राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र या काळात, सरकारच्या धोरणातील या बदलामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
जपानमध्ये कोरोना विषाणूच्या प्रकरणांमध्ये तीव्र वाढ झाली आहे. शनिवारी टोकियोमध्ये संक्रमणाची ४०५८ नवीन प्रकरणे नोंदली गेली. त्याच वेळी, मंगळवारी सुमारे ३७०९ नवीन प्रकरणे नोंदवली गेली. तर शोवा युनिव्हर्सिटी हॉस्पिटलचे संचालक हिरोनोरी सागर यांनी रॉयटर्सला सांगितले की, टोकियोमधील रुग्णालये आधीच गंभीर दबावाखाली कार्यरत आहेत. अनेक लोक उपचाराच्या आशेने रुग्णालयात येत आहेत. मात्र त्यांना पुन्हा पुन्हा नकार द्यावा लागत आहे. तसेच ऑलिम्पिक क्रीडाप्रकारातील उत्साहाच्या दरम्यान देशातील आरोग्य यंत्रणा अत्यंत बिकट स्थितीत आहे.
देशाचे मुख्य कॅबिनेट सचिव कात्सुनोबू काटो यांनी पत्रकारांना सांगितले की, ज्यांचे लसीकरण पूर्ण झाले आहे अशा वृद्धांमध्ये संसर्गाची प्रकरणे येत असताना ४० ते ५० वर्षांच्या तरुणांमध्ये संक्रमणाची गंभीर प्रकरणे नोंदवली जात आहेत आणि त्यांच्यामध्ये सतत वाढ नोंदवली जात आहे. जपानचे अधिकारी कोरोना विषाणूच्या भीतीने टोकियोबद्दल चिंतित आहेत. कारण संक्रमणाची प्रकरणे झपाट्याने वाढत आहेत.
कोरोनाची वाढती प्रकरणे पाहता, यापुर्वी ऑलिम्पिक क्रीडा आयोजकांचे म्हणणे आहे की, संक्रमणाची वाढती प्रकरणे आणि खेळ यांच्यात कोणताही संबंध नाही. क्रीडा संकुलात उपस्थित असलेल्या एकूण संख्येच्या सुमारे ८० टक्के खेळाडू आणि त्यांचे प्रशिक्षक यांना लसीकरण करण्यात आले आहे. त्याच वेळी, उर्वरित लोकांची नियमित चाचणी केली जात आहे. मात्र आता आयोजकांनी क्रीडा-संबंधित काही लोकांना कोवीड१९ प्रकरणांची लागण झाल्याचे मान्य केले आहे.