श्रीकृष्ण जन्माष्टमी विशेष लेखमाला
मथुरेचं श्रीकृष्ण जन्मभूमी मंदिर!
जिथे जगातले सर्वाधिक कृष्णभक्त दर्शनाला येतात!
मथुरेतील सर्वांत भक्तप्रिय मंदिर म्हणजे जन्मभूमी मंदिर. इ.स. पूर्वी ५०० वर्षांपासून या ठिकाणी श्रीकृष्णाचे दर्शन घेण्यासाठी भाविक येतात. आजही इ.स. २०२२ मध्ये जगभरातील सर्वाधिक श्रीकृष्णभक्त याच मंदिरांत भगवान श्रीकृष्णाचे दर्शन घेण्यासाठी येतात. गेल्या २००० वर्षांत काही अब्ज भाविकांनी येथे येउन श्रीकृष्णाचे दर्शन घेतले आहे. जगाच्या इतिहासात याला तोड़ नाही.
काल रात्री सगळ्या देशांत जन्माष्टमी साजरी झाली. देशभर आणि जगभर कृष्ण भक्तांनी आपल्या लाडक्या भगवान श्रीकृष्णाचा जन्मोत्सव आनंदात आणि उत्साहात साजरा केला. यावेळी टीव्ही वरून मथुरा येथील जन्मभूमी मंदिरांत श्रीकृष्णाचा जन्मोत्सव सगळ्या जगाने पहिला.१६७ देशांतून या जन्मोत्सवाचे LIVE प्रसारण करण्यात आले. जन्माष्टमी निमित्त आज आपण जेथे साक्षात भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाला त्या जन्मभूमी मंदिराची माहित घेणार आहोत.
मथुरेतील सर्वांत भक्तप्रिय मंदिर म्हणजे जन्मभूमी मंदिर. इ.स. पूर्वी ५०० वर्षांपासून या ठिकाणी श्रीकृष्णाचे दर्शन घेण्यासाठी भाविक येतात. आजही इ.स. २०२२ मध्ये जगभरातील सर्वाधिक श्रीकृष्णभक्त याच मंदिरांत भगवान श्रीकृष्णाचे दर्शन घेण्यासाठी येतात. गेल्या २००० वर्षांत काही अब्ज भाविकानी येथे येउन श्रीकृष्णाचे दर्शन घेतले आहे. जगाच्या इतिहासात याला तोड़ नाही.
या विशाल आणि भव्य देखण्या श्रीकृष्ण मंदिराच २००० वर्षांचा इतिहास खुपच चढ उताराचा आहे. भगवान श्रीकृष्णाच्या जीवन प्रमाणेच त्याच्या जन्मभूमी मंदिराचा इतिहासही संघर्षमय आहे. धर्मांध अतिरेक्यांनी कमीत कमी तीन वेळा हे मंदिर संपूर्णपणे नष्ट केले होते. परंतु भक्तांची श्रध्दा आणि विश्वास तासुभरही कमी झाला नाही. आज देशाच्या ७५ व्या स्वातंत्र्य दिना नंतरही लक्षावधी भाविक या मंदिरांत येउन आपल्या लाडक्या कन्हैयाचा जयघोष करतात. ही घटना एखाद्या चमत्कारापेक्षा कमी नाही!!!
मथुरा हे देशांतले प्राचीन नगरांपैकी एक आहे. इ.स. पूर्व ५०० वर्षे हे नगर अस्तित्वात होते याचे पुरावे उपलब्ध आहेत. त्याकाळी मथुरा ही शूरसेन राजाची राजधानी होती. पौराणिक काळात मथुरेला शूरसेन नगरी,मधुपुरी,मधुनगरी, मधुरा अशा अनेक नावांनी ओळखले जाई. अन्धकांचे उत्तराधिकारी उग्रसेन आणि कंस हे मथुरेचे शासक होते. यमुना नदीच्या काठावर वसलेले मथुरा हे प्राचीन काळापासून सुंदर शहर आहे.उत्तर प्रदेशाच्या पश्चिम सीमेवर मथुरा जिल्हा आहे. मथुरेच्या पूर्वेला एटाजिल्हा,उत्तरेला अलीगढ जिल्हा, दक्षिण पूर्वेला आगरा जिल्हा दक्षिण पश्चिमेला राजस्थान, तर पश्चिम -उत्तरेला हरियाणा हे राज्य आहेत. मथुरा हा आग्रा मंडलातील उत्तर-पश्चिमी जिल्हा आहे.मथुरा जिल्ह्यांत मांट,छाता,महावन आणि मथुरा हे चार तहसील आणि नांदगाव,छाता, चौमुहा,गोवर्धन,मथुरा,फरह,नौहझील,मांटा, राया आणि बल्देव हे दहा विकास खंड आहेत.
कंसाच्या मथुरेतील कारागृहात भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाल्याची घटना जगप्रसिद्ध आहे.श्रीकृष्णाच्या वडिलांचे नाव वासुदेव आणि आईचे नाव देवकी होते. कंसाने या दोघांना तुरुंगात टाकले होते. खरं म्हणजे कंस हा कृष्णाचा सख्खा मामा होता. पण त्यावेळी देवकीचा आठवा पुत्र कंसाचा वध करील अशी आकाशवाणी झाल्या मुळे मृत्यु भयाने घाबरलेल्या कंसाने देवकी आणि वासुदेव यांना तुरुंगात टाकून त्यांच्या सात अपत्यांचा कंसाने जन्म होताच वध केला होता.
जन्मभूमीचा इतिहास
ज्याठिकाणी भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाला त्या जागेवर पूर्वी कारागृह होते.या जागेवर सर्वांत पहिले श्रीकृष्ण मंदिर इ.स.पूर्वी 80-57 या काळात बांधण्यात आले. वसू नावाच्या व्यक्तीने हे मंदिर बांधले असल्याचा उल्लेख महाक्षत्रप सौदासच्या काळातील शिलालेखावरून ज्ञात झाले आहे. या नंतर अनेक शतकांनी इ.स. ८०० मध्ये विक्रमादित्याच्या काळात दुसरे मंदिर बांधण्यात आले.त्यावेळी भारतात बौद्ध आणि जैन धर्मांचे वर्चस्व निर्माण झाले होते.
विक्रमादित्य याने बांधलेले मंदिर इ.स. १०१७-१८ या वर्षी महमूद गजनवी याने तोडले. त्यानंतर इ.स. ११५० मध्ये महाराजा विजयपाल देव यांच्या शासन काळात जज्ज नावाच्या व्यक्तीने हे मंदिर बांधले. आधीच्या मंदिरा पेक्षा हे मंदिर अधिक विशाल होते. सोळाव्या शतकाच्या सुरुवातीला सिकंदर लोदी याने हे मंदिर नष्ट केले.
ओरछाचे शासक राजा वीरसिंह जू देव बुंदेला याने मंदिराचे अवशेष असलेल्या जागेवर पूर्वी पेक्षाही अधिक भव्य अतिशय विशाल असे मंदिर बांधले. हे मंदिर एवढे उंच आणि विशाल होते की आग्रा येथून ते दिसत असे. परंतु मुस्लिम धर्मांध शासकांनी इ.स. १६६९ मध्ये हे विशाल मंदिर तोडून त्याच्याच सामग्रीतुन मंदिराच्या जागेवर मोठी ईदगाह बनविली,जी आजही येथे अस्तित्वात आहे. या ईदगाहच्या मागील जागेवर पंडित मदन मोहन मालवीय यांच्या प्रेरणेने पुन्हा एक मंदिर स्थापन करण्यात आले परंतु आता हे वादाचे क्षेत्र बनले आहे कारण जन्मभूमीच्या अर्ध्या भागावर ईदगाह तर अर्ध्या भागात मंदिर आहे.
मथुरा परिक्रमा
मथुरेत गेल्यानंतर मथुरा परिक्रमा हा महत्वाचा विधि अनेक भाविक करतात. मथुरा परिक्रमेत भगवान कृष्णाशी संबधित प्रत्येक स्थानाचे दर्शन घेतले जाते. ही परिक्रमा ८४ कोसांची असते असे मानले जाते. परिक्रमा मार्गात अलीगढ, भरतपुर, गड्गाव, फरीदाबादची सीमा लागते. अर्थांत या परिक्रमेतील ८० टक्के भाग मथुरा जिल्ह्यातील असतो.
मथुरेतील इतर मंदिरं
मथुरेत जन्मभूमी मंदिरा प्रमाणेच इतरही अनेक ठिकाणे प्रेक्षणीय आहेत. उदा. विश्राम घाटा कड़े जाणार्या रस्त्यावरील प्राचीन द्वारकाधीश मंदिर, विश्राम घाट, पागल बाबा मंदिर, iskon मंदिर, यमुना नदीवरील अनेक घाट, भक्त ध्रुवाने जेथे तप केले ते ठिकाण, रमण रेती ही सगळी ठिकाण प्रेक्षणीय आहेत.
मथुरेतील १२ जंगलं
वराह पुराण तसेच नारदीय पुराणात मथुरे जवळील १२ वनांचा उल्लेख केलेला आढळतो. ही बारा वने अशी-
१) मधुवन २) तालवन ३) कुमुदवन ४) काम्यवन ५) बहुलावन ६) भद्रवन ७) खदिरवन ८) महावन (गोकुळ) ९) लौहजंघवन १०) बिल्व ११) भांडीरवन आणि १२) वृन्दावन
Janmasthami Special Article Mathura Krishna Temple
Vijay Golesar Shrikrishna