शुक्रवार, मे 9, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

जन्माष्टमी विशेष… अशी साजरी करतात देशभर जन्माष्टमी!

by India Darpan
सप्टेंबर 6, 2023 | 5:12 am
in इतर
0
Shrikrishna Janmashtami

जन्माष्टमी विशेष लेखमाला
अशी साजरी करतात देशभर जन्माष्टमी!

जन्माष्टमी म्हणजे गोकुळ अष्टमी, कृष्ण जन्माचा दिवस. श्रावण महिन्यात वद्य अष्टमी या तिथीला मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर मथुरेत कंसाच्या बंदिशाळेत श्रीकृष्णाचा जन्म झाला, म्हणून त्या दिवशी आनंदोत्सव साजरा करण्याची प्रथा आहे. भारताच्या विविध प्रांतात हा उत्सव भारतात सर्वत्र होतो. गोकुळ, मथुरा, वृंदावन, द्वारका,जगन्नाथ पुरी या ठिकाणी तो मोठ्या प्रमाणावर होतो. ओरिसामध्ये दहीहंडी जत्रा किंवा दहीभंगा जत्रा या दिवशी साजरी केली जाते. गोकुळ अष्टमीच्या दिवशी उपवास करण्याची प्रथा आहे. गुजराथमध्ये ‘सातम’ म्हणजे सप्तमीच्या दिवशी पैसे लावून किंवा तसेच दिवसभर पत्ते खेळतात. रात्री बारा वाजता पत्ते बंद करून कृष्णजन्माचा उत्सव सुरू करतात.

vijay golesar
विजय गोळेसर
मो. ९४२२७६५२२७

गोकुळाष्टमी हा सण भारतामध्ये खूप आनंदाने साजरा केला जातो. या दिवशी भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाला होता. त्यामुळे संपूर्ण भारतामध्ये त्यांच्या जन्मदिवशी दहीहंडी सारखे कार्यक्रम साजरे केले जाते. या दिवशी भगवान श्रीकृष्णाला वेगवेगळ्या नावांनी बोलावले जाते. जसे की गोविंद, बाल गोपाल, कान्हा, गोपाल केशव हि सर्व श्रीकृष्णांची प्रसिद्ध नावे आहेत. हिंदू पंचांगानुसार भगवान श्रीकृष्णाच्या जन्मापासून गोकुळाष्टमी ही भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या आठव्या दिवसापासून प्रत्येक वर्षी साजरी केली जाते.

गोकुळाष्टमीची पौराणिक कथा:
हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार श्रीकृष्ण हा सृष्टीचे पालनकर्ता असणार्या भगवान विष्णूचा आठवा अवतार मानला जातो. त्यामुळे भारतामध्ये हजारो वर्षांपासून गोकुळाष्टमी हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. गोकुळाष्टमी भारतामध्ये वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने श्रीकृष्णाचे पूजन करून केले जाते. काही ठिकाणी भक्ती संगीत गायले जाते. तर काही ठिकाणी कृष्णाच्या मूर्तीला दही दुधाचा अभिषेक घातला जातो.

‘गोकुळाष्टमी’चे महत्व:
कृष्णाचा जन्म दिवस श्रावण महिन्यात वैद्य अष्टमीला मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर मथुरेत कंसाच्या बंदीशाळेत झाला. म्हणून त्या दिवशी आनंदोत्सव साजरा करण्याची प्रथा आहे. अष्टमीच्या दिवशी काही लोक व्रत सुद्धा करतात , या दिवशी एकभूक्त राहून पांढर्‍या तिळाचा कल्प अंगाला लावून स्नान करतात. व्रताचा संकल्प करून देवघर फुलं, पाकळयांनी सुशोभित करतात. त्या स्थानी देवकीचे सुतीकारागृह स्थापन करतात. मंचकावर देवकी आणि कृष्ण यांच्या मूर्तीची स्थापना करतात व बाजूला यशोदा व तिची नवजात कन्या, वसुदेव नंद यांच्या मूर्ती बसवतात.

सप्तमीच्या मध्यरात्री शुचिर्भुत होऊन संकल्प करतात व सहपरिवार कृष्णाची पूजा करतात. अष्टमीच्या दिवशी देवालाही फराळ, नैवेद्य दाखवतात. गोपाल म्हणजे कायद्याचे पालन करणाऱ्या कृष्णाच्या या जन्मो- उत्सवाच्या निमित्ताने काल्याचा प्रसाद केला जातो. यामध्ये काला म्हणजे एकत्र मिळवणे. पोहे, ज्वारीच्या लाह्या, लिंबू व आंब्याचे लोणचे, दही, भिजवलेली डाळ, साखर, फळांच्या फोडी इत्यादी घालून केलेला एक खाद्यपदार्थ असतो.

लहानपणी श्रीकृष्णा हा सर्वांना फार प्रिय होता .श्रीकृष्ण व त्यांचे सवंगडी मिळून यमुनेच्या तीरावर काला तयार करत असत व वाटून खात असत. गोमंतकाळातील काल्याला गवळण काला सुद्धा म्हटला जातो आणि हे एक मिश्रण पौष्टीक आहार समजला जाते, म्हणूनही गोकुळाष्टमीचे महत्व आहे. कोकणात व महाराष्ट्रात उत्सवा निमित्त दहिकाला होतो. या ठिकाणी ही दही हंड्या फोडत, काही ठिकाणी गोपाळकाला होतो. गोकुळाष्टमीचे एक व्रतही सांगितले असून ते केल्याने संतती, संपत्ती व वैकुंठ लोक यांची प्राप्‍ती होते. असे महत्त्व आपल्याला दिसून येते.

गोकुळाष्टमी साजरी कशी करतात:
भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या अष्टमीच्या दिवशी मध्यरात्री मथुरा नगरीमध्ये श्रीकृष्ण भगवान यांनी पृथ्वीवर जन्म घेतला. त्या वेळेस मधुरेमध्ये जन्म झाला होता. त्यावेळेसचे मथुरे मधील अत्याचारी राजा कंस याला प्रजा कंटाळली होती. तो प्रजेवर असह्य यातना आणि जुलूम करत होता. त्यामुळे तेथील प्रजा खूपच दुखी व कष्टी होती. या लोकांचे अत्याचारी कंस राजापासून मुक्ती देण्यासाठी भगवान श्रीकृष्णाने पृथ्वीवर जन्म घेतला.

गोकुळाष्टमीच्या निमित्त मथुरा,वृंदावन आणि द्वारका येथील मंदिरात साजरा होणारा जन्मोत्सव हल्ली टीव्ही द्वारे संपूर्ण भारतामध्ये पाहता येतो. त्याचबरोबर परदेशी राहणाऱ्या भारतीय लोकांमध्ये सुद्धा गोकुळाष्टमी खूप धुमधडाक्यात साजरी केली जाते. अनेक भक्त गोकुळाष्टमीच्या दिवशी उपवास करतात, मंदिरांना सजवले जाते तसेच गोपाळाच्या मूर्तीला पाळण्यात ठेवून झोका दिला जातो. भजन-कीर्तनं केली जातात आणि त्यासोबतच तरुणांसाठी दहीहंडी फोडण्याच्या स्पर्धा आयोजित केल्या जातात.

श्रीकृष्णाची नगरी मथुराआणि वृन्दावन येथे देशभरातुन भक्त दर्शनासाठी येतात. त्या दिवशी संपूर्ण मथुरा आणि वृंदावन भगवान श्रीकृष्णाच्या नावाने दुमदुमून जाते. श्रीकृष्ण त्यांच्या लहानपणी लोणी, दही, दूध आपल्या मित्रांसोबत एकत्र येऊन चोरून खाण्याचा प्रयत्न करीत असत. दही हे त्यांचे आवडते खाद्य होते. म्हणून दहीहंडी महोत्सव त्यांच्या आठवणी निमित्त साजरा केला जातो.

गोपाळकाला!
उत्सवासाठी तयार केल्या जाणाऱ्या विशिष्ट प्रसादास गोपाळकाला असे म्हणतात. कृष्णजयंतीचा उत्सव भारतात सर्वत्र साजरा होतो. महाराष्ट्रात विशेषत: कोकणात या सणानिमित्त दुसऱ्या दिवशी दहीकाला केला जातो. त्याचे जेवण करून उपवास सोडला जातो. गोविंदा आला रे आला, गोकुळात आनंद झाला. अशी गाणी म्हणत लहान-मोठे पुरुष घरोघरी नाचायला जातात व दहीहंडी फोडतात.पाउस पड़त असतो आणि घरोघरी त्यांच्या अंगावर थंड पाणी देखील टाकतात.

कित्येक ठिकाणी गोपाळकाला करून श्रीकृष्ण चरित्रातील सोंगे करण्याचीही प्रथा आहे. या दिवशी महाराष्ट्रात मुंबई येथे उंचावर मडक्यात दही, दूध यांनी भरलेला हंडा ठेवून तिथपर्यंत मानवी मनोरेची स्थापना करून दहीहंडा फोडण्याचा साहसी खेळ होतो. श्रीकृष्ण त्याच्या मित्रांसोबत गाई चारण्यासाठी जात असत व आपल्या सर्व सवंगडयांच्या शिदोर्‍या एकत्र करून त्या खाद्यपदार्थाचा काला सर्व जण तो खात असत अशी एक कथा आहे. म्हणून या दिवशी गोपळकाला करण्याची व दहीहंडी फोडण्याची प्रथा आहे.

गोकुळाष्टमीची पौराणिक कथा:
श्रीकृष्णाने पृथ्वीवर देवकी आणि वासुदेव यांच्या पोटी जन्म घेतला. भगवान श्रीकृष्णाच्या जन्माच्या वेळेस अवकाश वाणी झाली होती, की देवकीचा आठवा पुत्र कंसाचा वध करेल. कंसाच्या अत्याचारांनी संपूर्ण मथुरा नगरी त्रस्त झालेली होती. त्याच्या राज्यात राज्यांमध्ये निर्दोष लोकांना सुद्धा शिक्षा केली जाई. आपल्या मृत्यूच्या भीतीने त्याने एवढेच नव्हे तर आपली बहिण देवकी आणि तिचा पती वासुदेव ह्यांना सुद्धा कालकोठडीमध्ये टाकले होते. एवढेच नव्हे तर कंसाने आपल्या अत्याचाराने देवकीचे सहा पुत्रही आधीच मारून टाकले होते.
भगवान श्रीकृष्णांच्या जन्म दिवशी आकाशातुन मुसळधार पावसाला सुरुवात झाली. भगवान श्रीकृष्णाला सुरक्षित स्थानावर घेऊन जाण्यासाठी वासुदेव यांनी त्याला एका टोपलीमध्ये ठेवले.

यमुना नदी पार करत त्यांनी भगवान श्रीकृष्णाला आपल्या मित्र नंद गोपाल कडे नेले आणि त्यांनी आपल्या पुत्राला, भगवान कृष्णाला यशोदा माते पाशी झोपून ठेवून त्यांची कन्या घेऊन परत आले. अशा प्रकारे देवकी पुत्र भगवान कृष्णाचे पालन-पोषण यशोदा मातेने केले मात्र भगवान श्रीकृष्णाच्या दोन माता आहेत. एक जन्मदाती आणि एक पालन कर्ती. एक म्हणजे देवकी माता आणि दुसरी म्हणजे यशोदा माता.परवा आपण गोव्यातील माशेल येथे असलेल्या देशातील एकमेव ‘देवकी कृष्ण मंदिरा’ची माहिती पहिली. अशाप्रकारे गोकुळाष्टमी भारतातील विविध राज्यात मोठ्या आनंदाने व उत्साहाने साजरी केली जाते.

मध्य प्रदेशात आणि उत्तर भारताच्या बऱ्याचशा भागात भाद्रपद कृष्ण अष्टमी साजरी करतात. या दिवशी अनेकांच्या घरी गोकुळ-वृंदावनाचा देखावा तयार करून जन्मोत्सव साजरा करतात. वैष्णव लोक तर हा दिवस विशेष भक्तीने पाळतात.वृंदावन येथे या दिवशी दोलोत्सव असतो.याच दिवशी कृष्णाच्या आयुष्यातील महत्त्वाची संकल्पना रासलीलाचे सादरीकरण केले जाते.

Janmashtami Special Various Tradition and Celebration by Vijay Golesar

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

साडेपाच वर्षांच्या रुदुराजला अशी मिळाली श्रवणशक्ती… सहा लाखांचे उपचार असे झाले…

Next Post

श्रावण मास विशेष… ६५ फुटी शिवोहम शिव महादेव!… अशी साकारली एवढी मोठी मूर्ती…

Next Post
Shivoham Shiv Mandir

श्रावण मास विशेष... ६५ फुटी शिवोहम शिव महादेव!... अशी साकारली एवढी मोठी मूर्ती...

ताज्या बातम्या

LtoR Mr. Hardeep Singh Brar Sr. VP Sales Marketing Kia India and Mr. Gwanggu Lee MD Kia India 1

किया इंडियाकडून कॅरेन्‍स क्‍लॅव्हिस लाँच…आकर्षक डिझाइनसह ही आहे वैशिष्‍ट्ये

मे 9, 2025
INDIA GOVERMENT

पाकिस्तानमधील स्ट्रीमिंग सामग्रीबाबत केंद्र सरकारची कडक भूमिका…दिले हे निर्देश

मे 9, 2025
8 2

भारतीय जनता पक्षाच्या शिष्टमंडळाने घेतली मुख्य निवडणूक आयुक्तांची भेट…हे आहे कारण

मे 9, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींचा आर्थिक व्यवहार डगमगण्याची शक्यता, जाणून घ्या, शुक्रवार, ९ मेचे राशिभविष्य

मे 9, 2025
Screenshot 20250508 204411 Facebook 1

नाशिक महानगरपालिका पाणीवापराचे थेट स्पॉट बिलिंग देणार…या एजन्सीची नियुक्ती

मे 8, 2025
IMG 20250508 WA0346 3

छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास राष्ट्रीय शैक्षणिक अभ्यासक्रमात समाविष्ट होणार…

मे 8, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011