श्रीकृष्ण जन्माष्टमी विशेष लेखमालाः
या मंदिरात आजही भगवान कृष्ण प्रत्यक्ष येतात!
‘बांके बिहारी’च्या या मुर्तित राधा देखील समाविष्ट झालेली आहे .त्यामुळे बांके बिहारीजींच्या मूर्तीतून विशिष्ट प्रकारची अलौकिक प्रकाश किरण बाहेर पडतात असे म्हणतात. त्यामुळेच बांके बिहारीच्या मुर्तीकड़े कुणीही एक मिनिट देखील एकटक पाहू शकत नाही. कदाचित त्यामुलेच बांके बिहारी च्या गाभार्यातील पडदे दर दहा पंधरा मिनिटांनी दोन मिनिटांसाठी बंद केले जातात.आजही श्री बांके बिहारी रात्रीच्या वेळी निधिवनात जातांत असा अनुभव आहे, श्रध्दा आहे.
भगवान श्रीकृष्णाचा जन्म जरी माथुरेतील कंसाच्या कारागृहात झाला तरी त्याचा जन्म झाल्या बरोबर करागृहाचे दरवाजे उघडले.सगळे पहारेकरी झोपी गेले आणि एका टोपलीत नवजात बालकाला घेउन वासुदेव गोकुळात गेला. तिथे यशोदे समोर बाल कृष्णाला ठेवून तिच्या नवजात कन्येला घेउन तो पुन्हा मथुरेतील कारागृहात परत आला. कृष्ण जन्माची ही कथा प्रत्येक हिंदू माणसाला ठावुक आहे.
श्री कृष्णाचा जन्म जरी मथुरेत झाला तरी त्याचे बालपण मात्र नंद , यशोदा आणि गोप- गोपी यांच्या सहवासात गोकुळात गेले. गोकुळालाच हल्ली वृन्दावन म्हणतात. त्यामुळे वृंदावनाची ब्रज भूमी श्रीकृष्णाच्या बाललिलांनी पवित्र झाली.
आजही श्रीकृष्ण वृंदावनात असतो अशी श्रद्धा भाविकांच्या मनात असते. त्यामुळेच वृन्दावनातील श्री कृष्ण मंदिरांना सर्वाधिक महत्व दिले जाते. अर्थांत हा श्रद्धेचा, विश्वासाचा विषय असल्याने प्रत्येक कृष्ण भक्ताला वृंदावनात जावून तिथेच श्रीकृष्ण दर्शन घेण्याची आस असते.
वृन्दावनातील १७ मंदिरं
तसं पहिलं तर वृंदावनात श्री कृष्णाची १७ मोठी मंदिरं आहेत. या प्रत्येक मंदिराला अनेक शतकांचा ,अनेक आख्यायिकाचा इतिहास लाभलेला आहे. यातले प्रत्येक मंदिर उभ्या उभ्या पहायचे म्हटले तरी किमान प्रत्येकी दोन ते तीन तास वेळ लागतो. या मंदिरांत ‘बांके बिहारी मंदिर’,’ प्रेम मंदिर’, ‘वृन्दावनचे इस्कान टेम्पल’, ‘राधा रमण मंदिर’, ‘श्री रंगनाथ मंदिर’, ‘कात्यायनी पीठ’, ‘शाहजी मंदिर’, ‘गोकुळनंद मंदिर’,’गोविंद देवजी मंदिर’, ‘गोपेश्वर महादेव मंदिर’, ‘राधा वल्लभ मंदिर’, ‘रंगजी मंदिर’,’निधिवन मंदिर’,’श्री गोपीनाथजी मंदिर’, ‘प्रियकांत ज्यू टेम्पल’, ‘मदन मोहन मंदिर’,’जयपुर टेम्पल’ या प्रमुख मंदिरांचा समावेश आहे. या शिवाय लहान मोठी शेकडो मंदिर येथे पहायला मिळतात. देशभरातील भाविकांची या सर्व मंदिरांत गर्दी असते. हे सगळ खरं असले तरी वृंदावनचे नाव घेतल्या बरोबर नजरे समोर उभे रहते ते-‘ बांके बिहारी मंदिर’!
जगप्रसिद्ध श्री बांके बिहारी मंदिर!
वृंदावन आणि मथुरा येथील सर्व श्रीकृष्ण मंदिरांत सर्वाधिक भक्त प्रिय सर्वांत सुप्रसिद्ध मंदिर म्हणजे बांके बिहारी मदिर!
वृंदावन येथील बांके बिहारी मंदिराची स्थापना प्रख्यात गायक तानसेन यांचे गुरु श्री हरिदास यांनी केली होती. श्री हरिदासजी केवळ शास्त्रीय संगीतातील श्रेष्ठ विद्वानच नव्हते तर ते अतिशय उच्च कोटीचे श्रीकृष्ण भक्त होते. श्री हरिदास स्वामी विषय उदासीन वैष्णव होते. त्यांच्या भजन आणि किर्तनाने साक्षांत भगवान श्रीकृष्ण बांके बिहारीच्या रुपांत प्रकट झाले होते.
हरिदास : रसनिधि सखीचा अवतार
वृंदावन पासून जवळ असलेल्या राजपुर नावाच्या गावात संवत १५३६ च्या भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील अष्टमीला श्री हरिदास यांचा जन्म झाला. सावळया रंगाचा श्री बांके बिहारी हे त्यांचे आराध्य दैवत होते. त्यांच्या वडिलांचे नाव गंगाधर तर आईचे नाव चित्रा देवी होते. स्वामी आशुधीर देव जी यांनी हरिदासजीना लहानपणा पासूनच शिष्य म्हणून स्विकारले होते. हरिदास हे रसनिधि सखीचा अवतार असल्याची स्वामी आशुधीर देव यांची श्रद्धा होती. हरिदास जी लहानपणा पासूनच संसारा पासून विरक्त होते.किशोरावस्थेत असतानाच त्यांनी स्वामी आशुधीर देव यांचे कडून दीक्षा घेतली आणि यमुनेच्या काठावरील घनदाट असलेल्या निकुंज वनात एकांतात जावून ते ध्यान मग्न होत असत.पंचवीस वर्षांचे झाल्यावर त्यांनी गुरुंच्या संमतीने भगवी वस्त्र प्राप्त केली आणि संसाराच्या मोह पाशापासून दूर जावून निकुंज बिहारीच्या नित्य लीलांचे चिंतनात रममाण होवू लागले.
तीन ठिकाणी वाकलेले -बांके बिहारी!
स्वामी हरिदास निकुंज वनात ध्यान धारणेत मग्न असतांनाच त्यांनी जमिनीत असलेली बिहारीजीची मूर्ती काढण्याचा स्वप्नादेश मिळाला.हरिदासजींच्या आज्ञेने श्यामवर्णी श्री विग्रहाला भूमातेच्या पोटातुन बाहेर काढन्यात आले. हीच श्यामवर्णी मनोहर मूर्ती श्री बांके बिहारीजींच्या नावाने जगप्रसिद्ध झाली. ही मूर्ती तीन ठिकाणी वाकलेली आहे त्यामुले हिला बांके बिहारी हे नाव पडले असे म्हणतात.
मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पंचमीला बांके बिहारीजीची मूर्ती उत्खनन करून बाहेर काढण्यात आली होती.त्यामुले मूर्ती प्रकट झाली तो दिवस अनेक वर्षांपासून विहार पंचमीच्या रुपाने मोठ्या उत्सवाने साजरा केला जातो. या मूर्तीला युगल किशोर देखील म्हणतात. कारण राधा आणि कृष्ण यांचे संयुक्त रूप या मूर्तीत एकवटले आहे अशी मान्यता आहे.
मूर्तीतून अलौकिक प्रकाश किरणं बाहेर पडतात
‘बांके बिहारी’च्या या मुर्तित राधा देखील समाविष्ट झालेली आहे .त्यामुळे बांके बिहारीजींच्या मूर्तीतून विशिष्ट प्रकारची अलौकिक प्रकाश किरण बाहेर पडतात असे म्हणतात. त्यामुळेच बांके बिहारीच्या मुर्तीकड़े कुणीही एक मिनिट देखील एकटक पाहू शकत नाही. कदाचित त्यामुलेच बांके बिहारी च्या गाभार्यातील पडदे दर दहा पंधरा मिनिटांनी दोन मिनिटांसाठी बंद केले जातात.
स्वामी हरिदास यांनी निधि वनात अनेक वर्षे श्री बांके बिहारीजीची सेवा केली. वृंदावनात नवीन मंदिर बांधल्या नंतर निधिवन येथून श्री बांके बिहारीजींची मूर्ती आणून तिची प्रतिष्ठापना करण्यात आली. परंतु आजही श्री बांके बिहारी रात्रीच्या वेळी निधिवनात जातांत असा अनुभव आहे. श्रध्दा आहे.
सुरुवातीला परंपरे नुसार सनाढ्य वंशातील श्रीकृष्ण यती श्री बांके बिहारीजी नित्य पूजा,सेवा , भोग आदि सर्व व्यवस्था संभालित असत.नंतर संवत १९७५ मध्ये त्यांनी ही व्यवस्था करण्यासाठी हरगुलाल शेठजीयांची नियुक्ती केली. पुढे हरगुलाल शेठजी यांनी वेरी,कोलकत्ता रोहतक येथे श्री बांके बिहारी ट्रस्ट ची स्थापना केली . अनेक भक्तांचा मोठा आर्थिक सहभागही या देवस्थानाला मिळत होताच. पूर्वी काळापहाड नावाचा म्लेच्छ मूर्ती भंजक या भागात उत्पात करीत होता.त्यावेळी अनेक मंदिरातील देव देवतांच्या मूर्ती त्याच्या भीतीने सुरक्षित ठिकाणी लपवून ठेवण्यात आल्या होत्या. परंतु श्री बांके बिहारीजींची मूर्ती मात्र मंदिरातून कधीही हलविण्यात आली नाही. आजही अत्यंत प्रेम आणि भक्ती भावाने श्री बांके बिहारीजींची पूजा आराधना केली जाते.
श्री बांके बिहारी मंदिराची वैशिष्ट्ये :
हरिदासजीच्या उपासना पद्धतीत कालांतराने बदल करण्यात आले. ‘निम्बार्क संप्रदाया’तून ‘सखी भाव संप्रदाय’ या नवीन संप्रदायाची स्थापना करण्यात आली. आता ‘सखी भाव संप्रदाय’ पद्धती नुसार वृन्दावनातील सर्व मंदिरांतसेवा महोत्सव साजरे केले जातात.
श्री बांके बिहारी मंदिराची अनेक वैशिष्ट्ये सांगितली जातात. बांके बिहारी येथे लहान बालकाच्या स्वरुपांत पुजले जातात. त्यामुळे एखाद्या लहान बाळा प्रमाणे येथे श्री बांके बिहारीजीची काळजी घेतली जाते.
१) श्री बांके बिहारी मंदिरांत केवळ शरद पौर्णिमेच्या दिवशीच श्री बांके बिहारी बासरी धारण करतात.
२) श्रावण महिन्यातील तृतीया याच दिवशी ठाकुरजी झोक्यावर बसतात.
३) वर्षांतुन फक्त एकदा जन्माष्टमीच्या दिवशीच श्री बांके बिहारी जींची मंगला आरती करतात. ज्यांच्या नशिबात असेल त्यांनाच फक्त या मंगला आरतीत सहभागी होता येते.
४) फक्त अक्षय तृतीयेच्या दिवशी श्रींचे चरण दर्शन होते. ज्यांना ठाकुरजीच्या चरणाचे दर्शन होते त्यांच्या सात पिढ्यांचा उद्धार झाला असे समजले जाते.
५) श्री बांके बिहारीजीना आणणारे स्वामी हरिदासजी हे त्याकाळी शास्त्रीयसंगीताचे सुप्रसिद्ध गायक होते. अकबर बादशहाच्या दरबारातील नवरत्नापैकी गायक तानसेन यांचे ते गुरु होते.
६) श्री बांके बिहारी आजही मध्यरात्री रास खेळण्यासाठी निधिवनात येतात अशी मान्यता आहे. देवाला रात्रभर जागरण झाल्या मुले येथे पहाटेची मंगला आरती केली जात नाही
७) श्री बांके बिहारी मंदिराच्या दर्शन वेळा लक्षांत ठेवा-सकाळी ९-१२ आणि सायंकाली ६ ते ९ पर्यंत .विशेष तिथि व उत्सवा नुसार यांत बदल केले जातात.
८) येथे प्रमुख गाभार्यात श्री बांके बिहारीजी समोर पडदे लावलेले असतात.दर १० ते १५ मिनिटांनी एक ते दोन मिनिटांसाठी पडदे बंद केले जातात.
Janmashtami Special Bhagwan Krishna Come in this Temple by Vijay Golesar