मुंबई – अभिनेत्री जान्हवी कपूरने स्वीमसूट मधील फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत. अल्पावधीतच हे फोटो तुफान व्हायरल झाले आहेत. जान्हवी सोशल मिडियावर खुपच सक्रीय असते. आपल्या चाहत्यांसाठी ती सतत फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. जान्हवी ही प्रसिद्ध अभिनेत्री श्रीदेवी आणि बोनी कपूर यांची कन्या आहे. मालदीव येथे ती सुट्ट्यांसाठी गेली होती. त्यावेळी तिने स्विमसूट घातला आणि ते फोटो शेअर केले आहेत.