नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण आणि नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्री, प्रल्हाद व्यंकटेश जोशी यांच्या हस्ते ६० रास्त भाव दुकानांचे प्रायोगिक तत्वावर जनपोषण केंद्रात रूपांतर करण्यात आले. यावेळी त्यांच्या हस्ते रास्त भाव दुकान (एफ पी एस) सहाय ऍप्लिकेशन, मेरा रेशन ऍप 2.0, गुणवत्ता व्यवस्थापन प्रणाली, गुणवत्ता मॅन्युअल हँडबुक, भारतीय अन्न महामंडळ कंत्राट मॅन्युअल यांचे उद्घाटन झाले आणि ३ प्रयोगशाळांना चाचणी आणि कॅलिब्रेशन प्रयोगशाळांसाठी राष्ट्रीय मान्यता मंडळाच्या वतीने मान्यता देण्यात आली.
उद्घाटन झालेल्या सर्व सहा उपक्रमांमुळे अन्न सुरक्षा परिसंस्थेला अधिक बळकटी येईल तसेच त्यामध्ये पारदर्शकता, कठोर गुणवत्ता नियंत्रण येईल तसेच भ्रष्टाचाराला आळा बसेल आणि प्रणालीमध्ये असलेल्या त्रुटी दूर होतील, असे त्यांनी या कार्यक्रमाला संबोधित करताना सांगितले.
संपूर्ण भारतातील रास्त भाव दुकानदारांच्या (FPS) मागण्या लक्षात घेऊन जनपोषण केंद्र त्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी सहायक ठरते असे जोशी यांनी सांगितले. यावेळी गुजरात, राजस्थान, तेलंगणा आणि उत्तर प्रदेशमधील ६० रास्त भाव दुकानांचे प्रायोगिक तत्वावर जनपोषण केंद्रात रूपांतर करण्यात आले.हा एक पथदर्शी कार्यक्रम आखण्यात आला आहे.या केंद्रांच्या माध्यमातून ग्राहकांना विविध प्रकारच्या पोषण-समृद्ध अन्नपदार्थांचा पुरवठा होईल तसेच रास्त भाव दुकानदारांना उत्पन्नाचा अतिरिक्त स्रोत उपलब्ध होईल.
यावेळी मंत्र्यांच्या हस्ते रास्त भाव दुकान (एफ पी एस) सहाय ऍप्लिकेशन, मेरा रेशन ऍप 2.0, गुणवत्ता व्यवस्थापन प्रणाली, गुणवत्ता हस्तपुस्तिका, भारतीय अन्न महामंडळ कंत्राट हस्तपुस्तिका यांचा प्रारंभ करण्यात आला. तसेच तीन प्रयोगशाळांना चाचणी आणि ‘कॅलिब्रेशन’ प्रयोगशाळांसाठी राष्ट्रीय मान्यता मंडळाच्या वतीने परवानगी देण्यात आली.
उद्घाटन झालेल्या सर्व सहा उपक्रमांमुळे अन्न सुरक्षा परिसंस्थेला अधिक बळकटी येईल तसेच त्यामध्ये पारदर्शकता, कठोर गुणवत्ता नियंत्रण येईल तसेच भ्रष्टाचाराला आळा बसेल आणि प्रणालीमध्ये असलेल्या त्रुटी दूर होतील, असे मंत्री प्रल्हाद जोशी यांनी या कार्यक्रमाला मार्गदर्शन करताना सांगितले.
संपूर्ण भारतातील रास्त भाव दुकानदारांच्या (FPS) मागण्या लक्षात घेऊन जनपोषण केंद्र त्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी सहायक ठरते असे जोशी यांनी सांगितले. यावेळी गुजरात, राजस्थान, तेलंगणा आणि उत्तर प्रदेशमधील ६० रास्त भाव दुकानांचे प्रायोगिक तत्वावर जनपोषण केंद्रात रूपांतर करण्यात आले. या केंद्रांच्या माध्यमातून ग्राहकांना विविध प्रकारच्या पोषण-समृद्ध अन्नपदार्थांचा पुरवठा होईल तसेच रास्त भाव दुकानदारांना उत्पन्नाचा अतिरिक्त स्रोत उपलब्ध होईल.