पालघर – पूर्व प्रधानमंत्री, भारत रत्न अटल बिहारी वाजपेयी यांचे पुण्यतिथि निमित्त प्रतिमेचे पूजन करत केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री ना. डॉ. भारती पवार यांनी आज नमन केले. त्यानंतर भाजपा पालघर जिल्ह्यातील सर्व मोर्चे व आघाड़ी तर्फे जन आशीर्वाद यात्रेच्या प्रारंभी राज्यमंत्री ना. डॉ.भारती पवार यांचे स्वागत करत शासकीय विश्रामगृह पालघर येथून यात्रेचा शुभारंभ करण्यात आला. केंद्रीय राज्यमंत्री ना.डॉ.भारती पवार यांचा सोमवारपासून जनआशीर्वाद यात्रेला सुरुवात झाली असून याची सांगता २० ऑगस्टला धुळे जिल्ह्यात होणार आहे.
पालघर, नाशिक, मालेगाव, नंदुरबार, धुळे हे जिल्हे ‘भाजप’ मय
देशाचा कारभार लोकाभिमुख असावा, या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून जनतेचा आशीर्वाद घेण्यासाठी केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री ना.डॉ.सौ.भारती प्रवीण पवार यांचेकडून पालघर, नाशिक, मालेगाव, नंदुरबार, धुळे जिल्ह्यात सोमवारपासून .१६ ऑगस्ट ते २० ऑगस्टपर्यंत झंझावाती जनआशीर्वाद यात्रा आहे. या यात्रेत भाजपाचे जिल्हास्तरीय व स्थानिक पातळीवरील नेतेही सहभागी होत असल्याने संपूर्ण वातावरण भाजपमय झाले आहे.
नाशिक जिल्ह्यातून ६० वर्षानंतर पहिल्यांदाच केंद्रीय मंत्रिमंडळात सामील होण्याचा बहूमान आदिवासी समाजातील उच्चशिक्षित खासदार डॉ.भारती प्रवीण पवार यांना देण्यात आला. केंद्रात प्रथमच ओबीसी समाजाला २७ मंत्रिपदे मिळाली असून, वर्षानुवर्षे अन्याय झालेल्या ओबीसी व मागासवर्गीय समाजाला प्राधान्य देण्याचा .पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा प्रयत्न आहे. त्याला नाशिक जिल्ह्यासह उत्तर महाराष्ट्रातून नागरिकांची पसंती मिळत आहे. त्यानिमित्ताने जनआशीर्वाद घेण्यासाठी भाजपाकडून यात्रा काढली जात आहे. केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री ना.डॉ.भारती प्रवीण पवार यांच्याकडून पालघर, नाशिक, मालेगाव, नंदुरबार, धुळे मधील यात्रेचे नेतृत्व केले जाणार आहे.
पालघर शहरातील हुतात्मा चौकातून १६ ऑगस्ट रोजी यात्रेला सुरुवात झाली असून आज पालघर ,वाघोबा मंदिर, मानोर, चारोटी, महालक्ष्मी मंदिर, तलासरी, वनवासी कल्याण केंद्र हातणे, विक्रमगड, वादघाटना, जव्हार, मोखाडा व सायंकाळी त्रंबकेश्वर येथून यात्रा जाणार आहे. दुसऱ्या दिवशी १७ ऑगस्ट रोजी नाशिक येथील दहावा मैल, ओझर, पिंपळगाव, शिरवाडे फाटा, मंगरूळ, चांदवड, उमराना, सौंदाने, टेहरे, मालेगाव चौफुली, सटाणा नाका, सोयेगाव व मालेगाव परिसरातून यात्रा फिरेल. तिसऱ्या दिवशी १८ ऑगस्ट रोजी नामपूर, ताराबाद, पिंपळनेर, साक्री, सामोडे, मांडणे, दहीवेल निजामपूर शहरातील विविध भागातून यात्रा जाणार आहे. चौथ्या दिवशी १९ ऑगस्ट रोजी नंदुरबार जिल्ह्यातील अस्थे, साकी नाका, हात दरवाजा, सिंधी कॉलनी, जिल्हा रुग्णालय, सैनिक स्कूल पाथ्री, तळोदा, रंजनापूर, सोमवल, अकलकुवा, खापर, आदिवासी समाजाचे आराध्य दैवत देवमोगरा माता मंदिर, दोंडाईचा मार्गे यात्रा जाणार आहे. तर पाचव्या दिवशी २० ऑगस्ट रोजी धुळे जिल्ह्यात यात्रेची सांगता होईल.
जन आशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने केंद्रीय राज्यमंत्री ना.डॉ.भारती प्रवीण पवार यांचेकडून नागरिक, ग्रामस्थ यांच्याशी संवाद साधण्याबरोबरच विविध योजनांचा आढावा घेतला जाणार आहे. केंद्र सरकारच्या कल्याणकारी योजनांतील लाभार्थींशी संवाद, वरिष्ठ नागरिकांशी भेट, व्यापारी, डॉक्टर, उद्योजक आणि शेतकऱ्यांबरोबर संवाद, कोविड रुग्णालयाला भेट, लसीकरण केंद्रास भेट, भूमिपूत्रांशी संवाद, स्वच्छता अभियान, भाजपाचे समर्थ बूथ अभियान आदी. कार्यक्रमांमध्येही राज्यमंत्री ना.डॉ.भारती प्रवीण पवार यांचेसोबत भाजपा नेते व पदाधिकारी सहभागी होणार आहेत. भाजपाच्या जनआशीर्वाद यात्रेची जय्यत तयारी झाली असून भाजपाच्या कार्यकर्त्यांत उत्साह संचारला आहे. यात्रेच्या नियोजनाबाबत विविध बैठका सुरू असून पद्धतशीरपणे नियोजन केले जात आहे. त्याचबरोबर जास्तीत जास्त समाजघटकांना जोडून घेत नागरिक व ग्रामस्थांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सुचना दिल्या जात आहेत.
केंद्रीय आरोग्य व कुटुंबकल्याण राज्यमंत्री ना.डॉ.भारती प्रवीण पवार यांचेकडून तब्बल ४३१ किलोमीटरचा प्रवास यात्रेद्वारे केला जाणार आहे. त्याचबरोबर विविध कार्यक्रमं देखील होणार आहेत. विधानसभा निवडणुकीनंतर प्रथमच एकाच टप्प्यात पाच जिल्ह्यातील विविध भागात भाजप पोचत आहे. या यात्रेत पालघर, नाशिक, दिंडोरी, मालेगाव, नंदुरबार, आणि धुळे लोकसभा मतदारसंघातील भागाचा समावेश आहे.