नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी शनिवारी नवी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्यानंतर ही पहिल्यांदाच भेट झाली. यात विविध विषयांवर चर्चा झाली. जवळपास ३० मिनिटं ही बैठक झाली.
या ३० मिनिटं ही बैठकीत पहलगाम हल्ला आणि त्यानंतर निर्माण झालेल्या सुरक्षेच्या स्थितीसह इतर अनेक मुद्दयावर चर्चा झाली. या भेटीअगोदर नॅशनल कॅान्फरन्सच्या सूत्रांनी सांगितले की, उमर अब्दुला हे पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटून केंद्र सरकारच्या कोणत्याही निर्णयात जम्मू काश्मीर प्रशासनाकडून पूर्ण सहकार्य करणार असल्याचा विश्वास देणार आहेत. पहलगाम हल्यानंतर त्याचा बदला घेणं आणि देशाच्या सुरक्षेच्या मुद्दयावर केंद्राच्या भूमिकेवर काश्मीर सरकार सहकार्य करेल,
या भेटीनंतर पंतप्रधान कार्यालयाच्या एक्स (ट्विटर) हँडलवर याबाबत पुढील पोस्ट करण्यात आली आहे: “जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री @OmarAbdullah यांनी पंतप्रधान @narendramodi यांची भेट घेतली.”