नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जम्मू-काश्मीरच्या पूंछ जिल्ह्यात लष्करी वाहनाला लागलेल्या आगीत पाच जवानांना प्राण गमवावे लागले. या अचानक झालेल्या अपघातानंतर लष्कर आणि पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले. त्यांनी आजूबाजूच्या लोकांसह वाहनातील आग विझवून मदत आणि बचाव कार्य केले.
घनदाट जंगल असलेल्या भटादुडिया परिसरात लष्करी वाहनाला लागलेल्या आगीची गंभीर चौकशी करण्यात येत आहे. प्रामुख्याने वीज पडल्याने घटना घडण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, ज्या भागात ही घटना घडली, तेथे गेल्या वर्षी अनेक दिवस दहशतवादी आणि लष्कराच्या जवानांमध्ये चकमक सुरू होती.
पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, पूंछ आणि राजोरी जिल्ह्यांच्या सीमेवर भातादुडियान भागात गुरुवारी दुपारी हा अपघात झाला. या घटनेचा व्हिडिओही समोर आला आहे. त्यांनी सांगितले की, लष्करी वाहन पुंछ-जम्मू राष्ट्रीय महामार्गावर काही सामान घेऊन जात होते.
वाहनामध्ये जवान होते. अचानक लागलेल्या आगीमुळे जवान चांगलेच भाजले. यामध्ये पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. घटनास्थळी पोहोचलेल्या लष्करी अधिकारी आणि जवानांनी जळालेल्या साथीदारांना स्थानिक रुग्णालयात नेले.
लष्कराच्या प्रवक्त्याने लोकांना या घटनेचे फोटो आणि व्हिडिओ शेअर न करण्याचे आवाहन केले आहे. अपघाताची खातरजमा झाल्यानंतर ठोस माहिती दिली जाईल, असे ते म्हणाले.
Jammu Kashmir Army Vehicle Fire burn 5 Jawan Death