मुंबई – सीआरपीएफ, आयटीबीपी, एसएसबी, बीएसएफमध्ये भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या अंतर्गत केंद्रीय राखीव पोलीस दलात (सीआरपीएफ) पॅरामेडीकल स्टाफमध्ये नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे.
सशस्त्र दलातील सेवानिवृत्त सीएपीएफ आणि माजी सैनिक (पुरुष आणि महिला) या भरतीमध्ये सहभागी होऊ शकतात. सीएपीएफ, आसाम रायफल्स (एआर) आणि सशस्त्र दलांचे सेवानिवृत्त कर्मचारी ६२ वर्षे वयापर्यंत सीएपीएफ आणि एआरमध्ये पॅरामेडिकल कॅडर ड्यूटीमध्ये गुंतले जातील. सदर एक भरती एका वर्षाच्या करारावर असेल.
केंद्रीय राखीव पोलीस दलात (सीआरपीएफ) पॅरामेडीकल स्टाफमध्ये नोकरीसाठी दि. १३ ते१५ सप्टेंबर दरम्यान मुलाखती होतील. याद्वारे CRPF, ITBP, SSB, AR आणि BSF ची २४३९ पदे भरली जाणार आहेत.
उमेदवारांनी मुलाखती दरम्यान उमेदवारांनी त्यांची मूळ कागदपत्रे आणि त्यांच्या छायाप्रती सोबत आणाव्यात. तसेच सेवानिवृत्ती प्रमाणपत्र आणि पीपीओ, पदवी, जन्मतारखेचे प्रमाणपत्र आणि अनुभव प्रमाणपत्र इत्यादी कागदपत्रे सोबत आणावेत. त्याचप्रमाणे अर्जासोबत तीन छायाचित्रे आणावीत. तसेच वैद्यकीय निवडीच्या वेळी प्रत्यक्ष उपस्थित राहावे.
दरम्यान, बीएसएफ भरती प्रक्रिये अंतर्गत डायरेक्टरेट जनरल बॉर्डर सिक्युरिटी फोर्स (बीएसएफ) ने एसआय, एएसआय आणि कॉन्स्टेबलसह १७५पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार bsf.gov.in ला भेट देऊन ऑनलाईन अर्ज करू शकतात.