बुधवार, ऑगस्ट 27, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

राज ठाकरेंनी घेतली मनोज जरांगे-पाटलांसह आंदोलकांची भेट… त्यानंतर म्हणाले (व्हिडिओ)

by Gautam Sancheti
सप्टेंबर 4, 2023 | 12:51 pm
in महत्त्वाच्या बातम्या
0
F5KYxtfa8AAjdLh

जालना (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – ‘मराठा आरक्षणाच्या मागणी’साठी येथील अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे-पाटील यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांनी आंदोलन सुरू केले आहे. या आमरण उपोषण स्थळी काही दिवसांपुर्वी पोलिसांनी लाठीमार केला. त्यामुळे हे आंदोलन चिघळले आहे. त्याचे राज्यात ठिकठिकाणी पडसाद उमटत आहेत. त्याची दखल घेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज येथे येऊन आंदोलकांची भेट घेतली. यावेळी राज म्हणाले की, पोलिसांना दोष देऊन फायदा नाही. तर पोलिसांना आदेश देणारे दोषी आहेत. त्यामुळे एकप्रकारे राज यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधल्याचे बोलले जात आहे.

उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे-पाटील यांच्यासह त्यांच्या सहकारी आंदोलकांशी राज यांनी चर्चा केली. एकूणच मराठा आरक्षण आणि काल-परवाकडे झालेल्या लाठी हल्ल्याच्या अमानुष घटनेबाबत राज यांनी आंदोलकांशी सविस्तर चर्चा केली. या भेटीनंतर राज म्हणाले की, उपोषणस्थळी पोलिसांकडून लाठीमार झाला आणि गर्दी पांगवण्यासाठी हवेत गोळीबार पण झाला. ही घटना अतिशय दुर्दैवी आहे आणि मी ह्याचा निषेध नोंदवतो.

ह्या घटनेवर मी लक्ष ठेवून आहे, आणि ह्या घटनेवर येणाऱ्या प्रतिक्रिया पाहत होतो. मुळात मराठा समाजाने आरक्षणासाठी जी आंदोलनं केली, त्या आंदोलनांचा इतिहास बघितला, तर मी माझ्या अनेक सभांमध्ये म्हणलं तसं की, ती आंदोलनं, मोर्चे ह्याचा आदर्श जगाने घ्यावा इतकी शांततेत आणि समंजसपणे झाली होती. अशी पार्श्वभूमी असताना जालन्यात असं घडणार होतं की प्रशासनाने असं टोकाचं पाऊल उचललं? पोलिसांच्या अहवालात माहिती येईलच, पण मी खात्रीने सांगतो की, पूर्व-इतिहास बघता आंदोलकांनी कोणतंच चुकीचं पाऊल नसतं टाकलं. त्यामुळे इथे सरकारचं चुकलं हे निश्चित.

जालना येथील 'मराठा आरक्षण' आंदोलकांशी चर्चा केल्यानंतर उपस्थितांशी संवाद साधला. #मराठाआरक्षण #MarathaReservation #JalnaMarathaProtest pic.twitter.com/42ipPogHsL

— Raj Thackeray (@RajThackeray) September 4, 2023

राज पुढे म्हणाले की, राहता राहिला प्रश्न ह्या संवेदनशील विषयाचा, तर ह्याला आत्ताचे आणि आधीचे सगळेच जबाबदार आहेत. मराठा समाजाला आरक्षण देणं खरंच शक्य आहे का? ते न्यायालयात टिकेल का? बरं आरक्षण देऊन मराठा समाजातील मुलामुलींना देण्यासाठी किती सरकारी नोकऱ्या आहेत? त्या जोडीला ह्या समाजातील तरुण तरुणींना स्पर्धात्मक जगात घौडदौड करण्यासाठी कसं तयार करता येईल ह्यासाठी प्रामाणिक प्रयत्न होत आहेत का? (इथे घोषणा केलेल्या योजनांबद्दल बोलायचं नाहीये तर प्रयत्नांबद्दल बोलायला हवं).

मुळात हा प्रश्न फक्त मराठा समाजाच्या आरक्षणापुरता नाहीये, तर एकूणच मराठी तरुण-तरुणींच्या रोजगाराशी संबंधित आहे. साध्या तलाठी भरतीसाठी जर लाखभर अर्ज येत असतील आणि भरती अवघ्या शेकड्यात होणार असेल, तर मराठी मुलांच्या मनात काय धुमसतंय ह्याचा विचार करावा लागेल. शिकलीसवरलेली मुलं नोकरीच्या शोधात वणवण फिरत आहेत, हे चित्रं चांगलं नाही. त्यामुळे उगाच भूलथापा देणं किंवा एकमेकांवर आरोप करून स्वतःची मान काढून घेणं ह्या दोन्ही गोष्टी आधीच्यांनी आणि आत्ताच्यानी करू नयेत.

काल जे घडलं त्यात प्रशासनाची चूकच आहे पण ते ज्या कारणांनी घडलं, त्याला गेल्या २० वर्षांत महाराष्ट्राचं विस्कटलेलं राजकारण, समाजकारण आणि अर्थकारण जबाबदार आहे. ह्यावर दीर्घकालीन उपायांची गरज आहे. चकवा देऊन सरकार बनवणं आणि ते पाडून दुसरं सरकार आणणं, ह्यातून जे काही शौर्य दाखवायची खुमखुमी होती, ती खुमखुमी आता मिटली असेल असं आम्ही मानतो. त्यामुळे आता दोषारोप नकोत तर कृती अपेक्षित आहे.

माझी तमाम मराठा समाजातील बांधवांना विनंती आहे की ह्या घटनेचे पडसाद उमटू देऊ नका. तुम्ही आंदोलनं आणि मोर्च्यांचा आदर्श घालून दिला आहेत, तो खरंच वाखाणण्यासारखा आहे. तुमचा राग समजू शकतो पण तुम्ही कोणाच्या राजकारणाला आणि भूलथापांना बळी पडणार नाही ह्याबद्दल मला आणि माझ्या पक्षाला खात्री आहे. मराठी माणसाच्या आक्रोशातून उभ्या राहणाऱ्या कुठल्याही आंदोलनाच्या पाठीशी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आजपर्यंत उभी राहिली आहे आणि ह्यापुढे पण राहील, असे राज यांनी स्पष्ट केले.

'मराठा आरक्षणाच्या मागणी'साठी जालन्यातील अंतरवाली सराटी येथे उपोषणाला बसलेल्या श्री. मनोज जरांगे-पाटील व सहकारी आंदोलकांशी एकूणच मराठा आरक्षण आणि काल-परवाकडे झालेल्या लाठीहल्ल्याच्या अमानुष घटनेबाबत सविस्तर चर्चा केली. #मराठाआरक्षण #MarathaReservation #JalnaMarathaProtest pic.twitter.com/UDo7T8pnLu

— Raj Thackeray (@RajThackeray) September 4, 2023

#मराठाआरक्षण #MarathaReservation #JalnaMarathaProtest
Jalna Maratha Reservation Protest MNS Raj Thackeray Meet Politics

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

ठाण्यात भाजपमध्ये अशी सुरू आहे अंतर्गत गटबाजी… मंत्री आणि आमदार आमनेसामने… थेट पक्षश्रेष्ठींकडे तक्रारी…

Next Post

चंद्रावर विक्रम लँडरने मारली उडी… असे झाले सॉफ्ट लँडिंग… (बघा व्हिडिओ)

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

Screenshot 20250827 184001 Dailyhunt
महत्त्वाच्या बातम्या

उध्दव ठाकरे यांच्यानंतर देवेंद्र फडणवीस हे राज ठाकरे यांच्या निवासस्थानी…बाप्पाचे घेतले दर्शन

ऑगस्ट 27, 2025
2 1 1 1024x681 1
संमिश्र वार्ता

कृषी क्षेत्रात ‘एआय’ वापरासाठी या आर्थिक वर्षात ५०० कोटी रुपये मिळणार…

ऑगस्ट 27, 2025
539613361 1218995730272784 914712606899021038 n
स्थानिक बातम्या

मुंबई येथे नाशिकच्या उद्योजकांच्या संघटनेसोबत वीज दराबाबत महत्त्वपूर्ण बैठक….ऊर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी दिले हे निर्देश

ऑगस्ट 27, 2025
accident 11
क्राईम डायरी

देवदर्शनासाठी रस्त्याने पायी जाणा-या महिलेस दुचाकीची धडक…उपचारादरम्यान मृत्यू

ऑगस्ट 27, 2025
facebook insta
क्राईम डायरी

फेसबुकवरील फ्रेण्ड रिक्वेस्ट स्विकारणे महिलेस पडले महागात…सव्वा सोळा लाखाला गंडा

ऑगस्ट 27, 2025
GzWXER0a4AICfsU scaled e1756290053297
महत्त्वाच्या बातम्या

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरी गणेशाचे आगमन…बाप्पाला घातले हे साकडे (बघा, व्हिडिओ)

ऑगस्ट 27, 2025
Manoj Jarange Patil
महत्त्वाच्या बातम्या

मनोज जरांगे पाटील मुंबईला रवाना…ठिकठिकाणी स्वागत,पत्नी व मुलीला अश्रू अनावर

ऑगस्ट 27, 2025
INDIA GOVERMENT
संमिश्र वार्ता

या महाविद्यालयातील २१ शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार…महाराष्ट्रातील २ शिक्षकांचा समावेश

ऑगस्ट 27, 2025
Next Post
Chandrayaan3

चंद्रावर विक्रम लँडरने मारली उडी... असे झाले सॉफ्ट लँडिंग... (बघा व्हिडिओ)

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011