जालना (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जालना जिल्ह्यातील अंतरवली सराची गावात आंदोलकावर लाठीचार्ज केल्यानंतर सरकारने आता पोलिसांवर कारवाईचे सत्र सुरु केले आहे. त्यात जालना जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. त्यांना गृहमंत्रालयाने सक्तीच्या रजेवर पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. या कारवाईनंतर सरकार अजून काय पाऊल उचलते हे महत्त्वाचे आहे.
दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आंदोलकांवर लाठीमार केल्या प्रकरणी जालन्यातील पोलीस अधीक्षकाला आम्ही सक्तीच्या रजेवर पाठवले आहे. डीवायएसपीलाहा जिल्ह्यातून बाहेर पडण्याचे आदेश दिले आहेत. अतिरिक्त पोलीस महासंचालक (कायदा आणि सुव्यवस्था) सक्सेना हे उद्याच जालना येथे येतील आणि दोषींना निलंबित केले जाईल. मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीमाराच्या घटनेची वेळ पडल्यास न्यायालयीन चौकशीही केली जाईल या घोषणा केल्या.
जालना जिल्ह्यातील अंतरवली सराची गावामध्ये मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या उपोषणकर्त्यांवर शुक्रवारी पोलिसांनी लाठीमार केल्याची घटना घडली. आंदोलकांना रोखण्यासाठी पोलिसांनी हवेत गोळीबारही केला आहे. त्यानंतर या घटनेने राज्यभर संताप व्यक्त केला जात आहे. या घटनेची दखल विरोधकांनी घेतली असून त्यांनी या सर्व प्रकरणाचा निषेध केला आहे. तसेच, याप्रकरणी चौकशी करुन संबंधित पोलिस अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली होती.
२९ ऑगस्टपासून मराठा मोर्चा समन्वयक मनोज जरांगे यांच्यासह १० जणांचे उपोषण सुरू होते. या आंदोलनाला प्रतिसादही मिळत होता. त्यात लाठीचार्जची घटना घडल्यानंतर सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. त्यात सरकार विरोधात मोठा असंतोषही व्यक्त केला जात आहे. त्यामुळे सरकारने आता कारवाईचे पाऊल उचलले आहे. दरम्यान कारवाई करण्यासाठी तीन दिवस का लागले ? असा सवाल आंदोलकांनी केला आहे. तसेच अधीक्षकांना सक्तीच्या रजेवर पाठवले, पण आमच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत त्याचे काय? असा सवालही केला आहे.
District Superintendent of Police on compulsory leave
Jalna Lathi Charge State Government Police Action SP Transfer DYSP