जालना (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कोणताही संशय हा वाईटच असतो कारण एकदा संशयाचे भूत डोक्यात घुसले की, मग त्यातून काहीही विपरित घडू शकते. सासरच्यांनी विवाहीलेवर अनैतिक संबंधातून बाळ झाल्याचा संशय वारंवार व्यक्त केल्याने तसेच सासू, पतीकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून या विवाहितेने अखेर आत्महत्या केली.
लग्न झाल्यापासूनच संशय, त्रास
नांदेड जिल्ह्यातील देगलूर येथील भाग्यश्री हिचा विवाह काही वर्षापूर्वी जालन्यातील लक्ष्मीनारायणपुरा परिसरात राहणाऱ्या राजेश सत्यकुमार चिप्पावार ह्याच्याशी झाला होता. लग्नाला काही दिवस झाल्यानंतर पती राजेश आणि सासू गंगाबाई चिप्पावार हे दोघेही भाग्यश्री (वय २९) हिच्या चारित्र्यावर वारंवार संशय घेऊन गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने त्रास देत होते. ती मोबाईलवर वारंवार बाहेरील अज्ञात व्यक्तीशी बोलते असा आरोप करत तिच्याजवळ असलेला मोबाईल हिसाकावून घेत तिचा छळ करत होते. अखेर महिलेने पती आणि सासूच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी नातेवाईकांच्या तक्रारीवरून पती राजेश व सासू गंगाबाई यांच्या विरुद्ध जालना पोलिस ठाण्यात छळ करुन आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वारंवार मारहाण
सून गर्भवती अस ल्यावर खरंतर घरातील सर्वांना आनंद व्हायला होतो, पण येथे उलटे घडले, भाग्यश्री ही गरोदर असल्याने तीने बाळाला जन्म दिला. यानंतर हा त्रास वाढत जाऊन तिने जन्म दिलेले बाळ हे माझ्या मुलाचे नसून हे मुल बाहेर सुरु असलेल्या लफड्यातून झाले आहे; असा गंभीर आरोप नेहमीच सासू करत होती. सासू आणि पती राजेश हे तिला वारंवार मारहाण करत असल्याचा आरोप भाग्यश्री चिप्पावार यांचे भाऊ गणेश उपलांचेवार यांनी केला आहे. तसेच त्यांच्या वाढत गेलेल्या छळाला कंटाळून अखेर भाग्यश्रीने गळफास घेऊन आत्महत्या केली, अशी तक्रार भाग्यश्रीच्या भावाने दिली आहे. या तक्रारीवरून जालना पोलिसांनी पती आणि सासू विरुद्ध छळ करुन आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल दिला. यावरून पती राजेश आणि सासू गंगाबाई यांना अटक केली. दरम्यान महिलेवर पोलिस बंदोबस्तात अंत्यसंस्कार करण्यात आले असून या प्रकरणी जालना पोलिस अधिक तपास करत आहे. या प्रकरणामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.
jalna crime married women suicide
Family Torcher molestation husband mother in law