जळगाव – जळगावमध्ये महाविकास आघाडी सहकार पॅनलने मुसंडी मारत भाजपला धक्का दिला आहे. माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्यामुळे ही निवडणूक चर्चेत होती. पण, त्यांच्या पॅनलने निर्विवाद वर्चस्व मिळवत यश मिळवले आहे. एकूण २१ पैकी २० जागांवर सहकार पॅनलचे उमेदवार विजयी ठरले तर एका मतदार संघात अपक्ष उमेदवार भाजपा आमदार संजय सावकारे विजयी झाले आहेत. या निवडणुकीत २१ जागांपैकी ११ बिनविरोध झाल्या होत्या. रविवारी ११ जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडली. त्याचे निकाल हाती आले आहे.
या निवडणुकीत एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजीमंत्री डॉ. सतीश पाटील यांनी विजय मिळवला आहे. २१ जागांपैकी ११ जागा राष्ट्रवादी काँग्रेस, ७ जागांवर शिवसेना, २ जागांवर काँग्रेस आणि एका जागेवर भाजप उमेदवार विजयी झाले.
जळगाव (प्रतिनिधी) जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत महविकास आघाडी प्रणित सहकार पॅनलने वर्चस्व गाजवले आहे. या वृत्तातून जाणून आपण घेऊ या, कोणत्या उमेदवाराला किती मते मिळाली आहेत.
भुसावळ वि. का सहकारी मतदार संघ
१. सावकारे संजय वामन – २४
२. धनगर शांताराम पोपट – ४
यावल वि. का. सहकारी संस्था मतदार संघ
१. पाटील विनोदकुमार पंडितराव – २५
२. नेहेते गणेश गिरधर – २२
३. चौधरी प्रशांत लीलाधर – ०
चोपडा वि. का. सहकारी संस्था मतदार संघ
१. अग्रवाल घनशाम ओंकारलाल – ६३
२. पाटील संगीताताई प्रदीप – ०
३. पाटील सुरेश शामराव – ०
रावेर तालुका विविध कार्यकारी
१. महाजन जनाबाई गोंडू – २६
२. पाटील अरुण पांडुरंग – २५
३. पाटील राजीव रघुनाथ – ०
अनुसूचित जाती / जमाती मतदार संघ
१. सोनवणे शामकांत बळीराम – २४६४
२. बाविस्कर नामदेव भगवान – ८३
३. सरदार प्रकाश यशवंत – ६८
इतर मागास वर्ग मतदार संघ
१. डॉ. पाटील सतीश भास्करराव – २३१६
२. पवार विकास मुरलीधर – २४२
३. पाटील प्रकाश जगन्नाथ – ४०
४. पाटील राजीव रघुनाथ – २३
विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग
१. नाईक मेहताबसिंग रामसिंग – २३२६
२. वाघ विकास ज्ञानेश्वर – २८०
महिला राखीव मतदार संघ
१. अँड. खडसे येवलकर रोहिणी प्रांजल – २२३५
२. निकम शैलजादेवी दिलीपराव – १९२५
३. पाटील अरुणा दिलीपराव – ५२४
४. पाटील कल्पना शांताराम – ११३
५. पाटील सुलोचना भगवान – ११
६. पाटील शोभा प्रफुल्ल – ६
इतर संस्था व व्यक्तिगत सभासद मतदार संघ
१. देवकर गुलाबराव बाबुराव – १६०१
२. पाटील रवींद्र सूर्यभान – १८१
३. सरदार प्रकाश यशवंत – १३
४. पाटील प्रकाश जगन्नाथ – ७
५. पाटील उमाकांत रामराव – ३