जळगाव – भाजपमधून बंडखोरी करणारे ११ नगरसेवकांनी पुन्हा घरवापसी केली. महापौर निवडणुकीत जवळपास २७ नगरसेवक शिवसेनेबरोबर गेले होते. या अगोदर ३ जण परत आले आहेत. आता घरवापसी करणा-या नगरसेवकांची संख्या १४ झाली आहे. आज ११ नगरसेवकांनी आमदार गिरीश महाजन यांच्या जी. एम. फाऊंडेशन कार्यालयात आमदार सुरेश भोळे यांच्या उपस्थितीत प्रवेश केला. या घरवापसीमुळे भाजपची संख्या आता ४३ झाली आहे. शिवसेनेची संख्या ३२ वर आहे. यातील काही नगरसेवक कधीही परत जाऊ शकतात असे बोलले जात आहे.