चोपडा – तालुक्यातील वर्डी येथे हेलिकॉप्टर कोसळल्याची माहिती समोर येत आहे. ही दुर्घटना नेमकी कशी झाली ?, याबाबत अद्याप काहीही माहिती समोर आलेली नाहीय. यात दोन जणांचा मृत्यू झाला असून महिला पायलट गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
तालुक्यातील वर्डी येथे हेलिकॉप्टर कोसळले असून या दुर्घटनेत होलिकॉप्टर कसे कोसळले हे अद्याप समोर आलेले नाही. दरम्यान, घटनास्थळावर चोपडा शहर पोलीस पोहचले आहे. चोपडा तालुक्यातील वर्डी शिवारात सातपुडा पर्वत रांगेत असलेल्या राम तलाव परिसरात दुपारी चारच्या सुमारास हेलिकॅाप्टर कोसळले.दुर्घटना झालेले हेलिकॉप्टमध्ये प्रशिक्षणार्थीं असल्याचे बोलले जात आहे. या दुर्घटनेत महिला पायलट गंभीर जखमी आहे. दरम्यान, चोपडा तहसिलदार व नायब तहसिलदार घटनास्थळी पोहचले आहे.