जळगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – येथील गणपती हॅास्पिटलचे संचालक डॉ. शितल स्वरुपचंद ओसवाल यांना धनादेश अनादर प्रकरणी दाखल तीन खटल्यात ५० लाख रुपयांचा दंड आणि प्रत्येकी एक वर्षे तुरुंगवास अशी शिक्षा न्यायालयाने सुनावणी आहे. प्रथमवर्ग न्या. जान्हवी केळकर यांनी हा निकाल दिला आहे.
या प्रकरणी समजलेली माहिती अशी की, गणपती हॅास्पिटलमध्ये २००२ पासून लॅब टेक्नीशियन म्हणून अनित तोताराम शिरसाळे आणि त्यांच्या पत्नी असे दोघे जण काम करत होते. त्यांच्या पगारापोटी या दाम्पत्याला डॅा. शितल ओसवाल यांनी ५५ लाख रुपयांचे धनादेश दिले होते. या धनादेशापैकी दहा लाख रुपयांचे दोन व पाच लाख रुपयांचा एक धनादेश वटला नाही. त्यामुळे शिरसाळे यांनी न्यायालयात धाव घेतली. येथे धनादेश अनादर प्रकरणी तीन खटले प्रथमवर्ग न्या. जान्हवी केळकर यांच्यासमक्ष चालले.
या खटल्याचा निकाल आता आला असून त्यात डॅा. ओसवाल दोषी यांना शिक्षा सुनावण्यात आली. या शिक्षेत दंडासह तुरुंगवासाटी शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्याचप्रमाणे दंड न भरल्यास तीन महिन्याची शिक्षा देखील आहे.
jalgon crime court doctor punishment fine order
Legal Cheque Dishonor Ganpati Hospital Dr Shital Swarupchand Oswal