जळगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) सापळ्यात एकाचवेळी तीन पोलिस अडकले आहेत. हेमंत वसंत सांगळे (वय ५२ वर्ष, सहायक फौजदार, फैजपुर पोलीस स्टेशन, ता.यावल), किरण अनिल चाटे (वय-४० वर्ष, पोलिस नाईक, फैजपुर पोलीस स्टेशन ता.यावल) आणि महेश ईश्वर वंजारी (वय ३८ वर्ष, पोलिस नाईक, फैजपुर पोलीस स्टेशन, ता.यावल) अशी तिघा लाचखोर पोलिसांची नावे आहेत. या तिघांनी ४ हजारांची लाच मागितली होती. आणि ती घेताना ते एसीबीच्या पथकाला सापडले आहेत.
फैजपुर पोलीस स्टेशन हद्दीमधील बामणोद येथे एका व्यक्तीचा पत्त्याचा क्लब आहे. बामणोद येथे सांगळे व चाटे हे बीट मार्शल म्हणून कार्यरत आहेत. पत्त्याच्या क्लबवर कोणतीही जुगाराची कारवाई न करता सदर जुगाराचा क्लब सुरळीत चालू राहू देण्याच्या मोबदल्यात दरमहा ४,०००/रु.प्रमाणे लाचेची मागणी केली. त्यानंतर याप्रकरणी एसीबीकडे तक्रार करण्यात आली.
तक्रारदाराने फैजपुर पोलीस स्टेशन येथे जावून सांगळे व चाटे यांची भेट घेतली. यावेळी कामाची व पैशाची बोलणी करून सांगळे याने त्यांचे मोबाईल फोनवरून चाटे याला फोन करून तक्रारदार हे देत असलेल्या पैशांबद्दल बोलणी केली. तसेच, किती पैसे घ्यायचे याबाबत स्वतः बोलणी करून तक्रारदार यांचेकडे फोन दिली. तसेच, तक्रारदार व चाटे यांचे बोलणे करून दिले. स्वतःसाठी व चाटे याच्यासाठी दरमहा ३,०००/- रुपये लाचेची मागणी केली. तसेच, पोलीस स्टेशनचे गोपनीय शाखेतील अंमलदारांसाठी १,०००/-रु.अशी एकुण दरमहा ४,०००/रु.प्रमाणे लाचेची मागणी केली. सदर मागणी केलेली लाच रक्कम सांगळे याने पंचासमक्ष स्वतःस्विकारले. ही रक्कम त्याने वंजारी यांच्याकडे दिली. लंजारी याने सदर रक्कम पत्त्याचा क्लब सुरळीत चालु देण्यासाठीची माहिती असतांना त्यांनी ती लाच रक्कम स्वीकारली. म्हणून तिन्ही पोलिसां विरुद्ध फैजपुर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात येत आहे.
सापळा पर्यवेक्षण अधिकारी-*
श्री.शशिकांत पाटील, पोलिस उप अधीक्षक,ला.प्र.वि. जळगांव.
सापळा व तपास अधिकारी-*
श्री.एस.के.बच्छाव,पोलिस निरीक्षक, ला.प्र.वि. जळगांव.
*सापळा पथक-*
स.फौ.दिनेशसिंग पाटील,पो.ना.ईश्वर धनगर, पो.कॉ.राकेश दुसाने.
*कारवाई मदत पथक-*
श्रीमती. एन.एन.जाधव,पोलिस निरीक्षक, ला.प्र.वि. जळगांव.स.फौ.सुरेश पाटील, पो.हे.कॉ.अशोक अहिरे, पो.हे.कॉ.सुनिल पाटील, पो.हे.कॉ.रविंद्र घुगे, म.पो.हे.कॉ. शैला धनगर, पो.ना.जनार्दन चौधरी, पो.ना.किशोर महाजन, पो.ना.सुनिल वानखेडे, पो.ना.बाळु मराठे, पो.कॉ.प्रदिप पोळ , पो.कॉ.सचिन चाटे, पो.कॉ.अमोल सुर्यवंशी, पो.कॉ.प्रणेश ठाकुर.
*मार्गदर्शक-*
*1)* मा.श्रीमती शर्मिष्ठा घारगे-वालावलकर, पोलीस अधीक्षक , ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक. मोबा.नं. 91 93719 57391
*2)* मा.श्री.एन.एस.न्याहळदे साो., अप्पर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक.
*3)* मा.श्री.नरेंद्र पवार साो., वाचक पोलीस उप अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक.
सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की, त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ संपर्क साधावा.*
अँन्टी करप्शन ब्युरो,जळगाव. अल्पबचत भवन, जिल्हाधिकारी कार्यालय आवार, जळगांव
*@ दुरध्वनी क्रं. 0257-2235477*
*@ मोबा.क्रं. 8766412529*
*@ टोल फ्रि क्रं. 1064*
Jalgaon Yaval ACB Raid trap corruption bribe