शनिवार, जून 21, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

जळगावच्या घटनेनंतर राज्य सरकारला खडबडून जाग… राज्यभरातील बालगृहांसाठी घेतला हा निर्णय…

by India Darpan
जुलै 29, 2023 | 5:12 am
in महत्त्वाच्या बातम्या
0
F2Is0DhagAAf49G scaled e1690560816718

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्यातील बालगृहांच्या तपासणीसाठी कृती दलाची स्थापना करावी व या कृती दलाने दर तीन महिन्यांनी बालगृहांचा अहवाल शासनास सादर करावा. जळगाव येथे मुलींच्या वसतिगृहातील घडलेल्या घटनेचा कृती दलाने महिनाभरात अहवाल सादर करावा, असे निर्देश महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिले.

मंत्री कु. तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली मुलींचे वसतिगृह जळगाव येथे पाच अल्पवयीन मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेच्या अनुषंगाने महिला व विभागाची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी कु. तटकरे बोलत होत्या. यावेळी महिला व बालविकास आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे, नाशिक विभागातील विभागीय उपायुक्त, नाशिक विभागाचे पोलीस अधिकारी, जिल्हा महिला बाल विकास अधिकारी, बाल कल्याण समिती, सर्व निवासी संस्थांचे प्रतिनिधी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून सहभागी झाले होते.

मंत्री कु. तटकरे म्हणाल्या की, प्रत्येक बालगृहात कुलूपबंद तक्रार पेटी ठेवावी. त्यासाठी आयुक्तांनी एका अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी. या पेटीतील सर्व तक्रारींचे वेळेत निवारण करावे. विभागीय आयुक्तांनी जिल्हाधिकाऱ्यांची बैठक घेऊन याबाबत आढावा घ्यावा. बायोमेट्रिक ऐवजी चेहरा पडताळणी यंत्राची व्यवस्था बालगृहांमध्ये सुरू करावी. बालगृहातील सुविधांची नियमितपणे पडताळणी करावी. या तपासणीचा अहवाल आणि इतिवृत्त तत्काळ शासनास सादर करावे. याबाबत आयुक्तांनी व्यक्तिगत लक्ष घालून संवेदनशीलपणे काम करावे, अशाही सूचना मंत्री कु. तटकरे यांनी दिल्या.

जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील समितीकडून नियमित त्रैमासिक तपासणी करणे आवश्यक आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी तपासणी अहवाल शासनाला सादर करावा. प्रत्येक संस्थेत सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करावी. तसेच ती कार्यरत असल्याची खात्री करावी. बालकल्याण समितीने बालकांना बालगृहात दाखल करताना सखोल चौकशी करून आवश्यकता असेल, तरच बालगृहात दाखल आदेश द्यावेत. अन्यथा संस्थाबाह्य सेवांचा पर्याय निवडावा. पीडित बालकांना वैद्यकीय, समुपदेशन इ. सेवा तत्काळ पुरविण्यात याव्यात. संस्थेत बालकांसाठी सुदृढ व आनंदी वातावरण ठेवण्यासाठी आवश्यकतेनुसार स्वयंसेवी संस्था, सीएसआर, तज्ञांच्या सहकार्याने आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, अशा सूचनाही महिला व बालविकास मंत्री कु. तटकरे यांनी केल्या.

बालगृहांच्या तपासणीसाठी कृती दलाची स्थापना करुन दर तीन महिन्यांनी अहवाल शासनास सादर करावा. #जळगाव येथे मुलींच्या वसतिगृहात घडलेल्या घटनेचा महिनाभरात अहवाल सादर करावा, असे निर्देश महिला व बाल विकास मंत्री @iAditiTatkare यांनी विभागाच्या आढावा बैठकीत दिले. pic.twitter.com/Gnf7ZQAZRD

— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) July 28, 2023
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

आयटी रिटर्न भरण्यासाठी उरले अवघे ३ दिवस… अन्यथा…

Next Post

राजपूत भामटा जमातीच्या नावातील भामटा शब्द वगळणार का? मंत्री अतुल सावे यांनी दिले हे उत्तर

Next Post
vidhan parishad

राजपूत भामटा जमातीच्या नावातील भामटा शब्द वगळणार का? मंत्री अतुल सावे यांनी दिले हे उत्तर

ताज्या बातम्या

Maha Gov logo 07 1 1024x512 1

आषाढी एकादशी वारीसाठी दिंड्यांना २.८ कोटींचे अनुदान…१४०० दिंड्यांना प्रति दिंडी मिळणार इतके पैसे

जून 21, 2025
Gt0K8wtWoAA7onz 1024x768 1

औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील ५ वर्षांपेक्षा जास्त सेवा झालेले हे कर्मचारी होणार नियमित…

जून 21, 2025
rainfall alert e1699421697419

सध्याची पावसाची स्थिती व पेरणी…बघा, हवामानतज्ञ काय म्हणतात

जून 21, 2025
Screenshot 20250621 062146 Collage Maker GridArt

नाशिक जिल्हा परिषदेचा नवीन कार्यालयात जाण्याचा मुहूर्त अखेर ठरला…जुन्या इमारतीत होणार हे कार्यालय

जून 21, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी आरोग्याच्या तक्रारीबाबत दुर्लक्ष करू नये, जाणून घ्या, शनिवार, २१ जूनचे राशिभविष्य

जून 20, 2025
iiii e1750433022616

मुंबईत मुख्यमंत्री, केंद्रीय सहकार मंत्री यांच्या उपस्थित ‘सहकार से समृद्धी’ राष्ट्रीय परिसंवाद…

जून 20, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011