जळगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरात आज सकाळीच मोठी खळबळ उडाली आहे. कारण, सक्तवसुली संचालनालय (ईडी) आणि आयकर विभाग यांचे पथक येथे दाखल झाले. या पथकांनी प्रसिद्ध सराफ व्यावसायिक राजमल लखीचंद ज्वेलर्समध्ये (आरएल) यांच्याकडे एकाचवेळी धाड टाकली. आरएल ज्वेलर्स ही फर्म माजी खासदार ईश्वरलाल जैन आणि माजी आमदार मनीष जैन यांच्या मालकीची आहे. दोन्ही पथकांकडून जैन कुटुंबियांची आणि त्यांच्या व्यवसायाची चौकशी केली जात असल्याचे वृत्त आहे.
शहरातील राजमल लखीचंद ज्वेलर्समध्ये आज, गुरुवारी पहाटे गाड्यांचा ताफा पोहचला. फर्ममध्ये सक्तवसुली संचालनालय आणि आयकर विभागाची धाड पडल्याची चर्चा सुरुवातीला समोर आली. फर्मशी संबंधित एका व्यक्तीने सक्तवसुली संचालनालय आणि आयकर विभागाकडून चौकशी सुरु असून माजी आमदार मनीष जैन हे मध्ये अधिकाऱ्यांशी बोलत असल्याचे सांगितले.
सध्या फर्ममध्ये सक्तवसुली संचालनालय आणि आयकर विभागाचे अधिकारी चौकशी करीत आहेत. फर्ममध्ये ग्राहकांना जाऊ दिले जात नव्हते. त्यामुळे कर्मचारी देखील बाहेर उभे होते. दोन्ही पथक कोणत्या मुद्द्यावर चौकशी करीत आहेत हे अद्याप समोर आलेले नाही. याप्रकरणी लवकर अधिकृत माहिती दिली जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान, मनी लॉंड्रींगच्या प्रकाराची चौकशी सुरु असल्याची देखील चर्चा आहे.
आरएल फर्मवर यापूर्वीही आयकरची धाड पडली आहे. त्यामुळे बेहिशोबी संपत्ती, मनी लाँड्रिंग यासंदर्भात चौकशी करण्यात आली आहे.
Jalgaon Rajmal Lakhichand Jewelers ED IT Raid
RL Jewels Income Tax Enforcement Directorate Money Laundering