जळगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जळगावातील पोलिसांचा नृत्य करतानाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेचा ठरला आहे. या व्हिडीओमध्ये पोलीस एकमेकांवर पैशांची ओवाळणी करतांना दिसत आहे. एका बियरबारमध्ये पोलिसांनी टीमकीवर केलेला हा झिंगाट डान्सवर आता प्रतिक्रिया उमटू लागल्या असून या पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी केली जात आहे.
या व्हिडिओमध्ये नृत्य करणारे काही पोलीस हे जळगाव तालुका पोलीस स्टेशनचे कर्मचारी असून तर एक गुन्हे शाखेचा कर्मचारी आहे. तर काही जण खासगी व्यक्ती आहे. या व्हिडिओमधील कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी सुध्दा केली जात आहे. ही पार्टी कशासासाठी आयोजित केली होती. त्यामागे कारण काय व त्याचे आयोजन कोणी केले यासारखी प्रश्न आता उपस्थितीत केले जात आहे. या व्हिडीओमुळे जळगाव जिल्हा पोलीस दलाची प्रतिमा मलीन झाली आहे.
या बिअरमधील नृ्त्याच्या व्हिडिओमुळे पोलिसांच्या कामगिरीवर प्रश्न उपस्थित होत आहे. विधानसभेत जळगाव पोलिसांवर हप्ते खोरीसह अनेक गंभीर आरोप झाले. त्यानंतर हा व्हिडिओ समोर आल्यामुळे तो चर्चेत आला आहे. दरम्यान हा व्हिडिओ दीड वर्षापूर्वीचा हॉटेल सह्याद्री परमीट रुम व बियर बारमधीलअसल्याचे बोलले जात आहे. एका पोलीस कर्मचाऱ्यांच्या वतीने गेट टुगेदरच्या नावाने पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर या कर्मचा-यांनी नृत्य केल्याचे बोलले जात आहे. या नृत्य करणाऱ्यामध्ये बनावट मद्य विक्रीप्रकरणात गुन्हा दाखल असलेला एक संशयित व एक निलंबित पोलिसही दिसत आहे.
jalgaon police Zingat Dance Video Viral
Social Media