जळगाव– जिल्ह्यातील एरंडोलजवळ एनसीबीच्या पथकाने तब्बल १५०० किलो गांजा जप्त केला आहे. याप्रकरणी एनसीबीने दोन जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. हा गांजा आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथून आणला जात होता. एएनआय वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रासह मुबंईत सध्या मोठ्या प्रमाणात एनसीबीकडून कारवाया केल्या जात आहेत. या दरम्यान, एनसीबीने अनेक ड्रग्ज पॅडलर्सच्या मुसक्या आवळल्या आहेत. तर, बॉलिवूडशी संबंधित अनेकांवरही एनसीबीकडून कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे सध्या राज्यातील ड्रग्ज पॅडलर्समध्ये धाकधूक वाढली आहे. आरोपी कारमधून नशेच्या गोळ्या घेून जात असल्याची माहिती पोलीस निरीक्षक अशोक गिरी यांना गुरुवारी मिळाली होती. त्यांच्या सूचनेनुसार उपनिरीक्षक रोहित गांगुर्डे, अंमलदार देशराज मोरे यांच्या पथकाने अण्णा भाऊ साठे चौकात सापळा रचून गाडी अडवली. सय्यद मंजूरची तपासणी केली असता १३ स्ट्रीपमध्ये २६० गोळ्या आढळून आल्या.