इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यातील वरखेडी येथील दुर्देवी घटना घडल्याचे समोर आले आहे. आज दुपारी अंदाजे १२.३० वाजता ही घटना घडली.
शेतातील पिकांचे संरक्षण करण्यासाठी वन्यप्राण्यांपासून बचाव करण्याच्या उद्देशाने विजेच्या तारांचा वापर करण्यात आला होता. त्यामध्ये आलेल्या विद्युत धक्क्यामुळे दोन लहान मुले, दोन महिला आणि एक पुरुष अशा मिळून ५ व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. मृतदेह पुढील कार्यवाहीसाठी व पोस्टमार्टमसाठी रुग्णालयात हलविण्यात आलेले आहेत.
हे पाचही जण एकाच कुटुंबातील असून ते शेतात काम करण्यासाठी जात असतांना ही घटना घडली. हे कुटुंब आदिवासी पावरा समाजाचे होते अशी माहिती समोर आली आहे.