बुधवार, ऑगस्ट 6, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

हातभट्टी दारूविरोधात मोठी कारवाई; १३४ गुन्हे नोंद, १४.४८ लाखांचा मुद्देमाल जप्त

by Gautam Sancheti
जुलै 11, 2025 | 4:43 pm
in स्थानिक बातम्या
0
IMG 20250711 WA0280 1

जळगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– जळगाव जिल्ह्यात अवैध हातभट्टी दारूच्या विरोधात मोठी मोहीम राबवण्यात आली. शासनाच्या “शून्य सहनशीलता धोरणा”नुसार जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या आदेशावरून आणि पोलिस अधीक्षक महेश्वर रेड्डी तसेच राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक व्ही.टी. भुकन यांच्या मार्गदर्शनाखाली ही संयुक्त कारवाई करण्यात आली. दिनांक ०९ जुलै २०२५ रोजी एकाच दिवशी संपूर्ण जळगाव जिल्ह्यात पोलिस विभाग आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाने संयुक्तरित्या धाडसत्र राबवले. या धाडसत्रादरम्यान एकूण १३४ गुन्ह्यांची नोंद करण्यात आली असून मोठ्या प्रमाणात दारू, कच्चे रसायन आणि एक वाहन जप्त करण्यात आले.

ही कारवाई अत्यंत ठोस आणि प्रभावी ठरली. या मोहिमेमध्ये एकूण ३३८५ लिटर गावठी हातभट्टी दारू, २०१५० लिटर रसायन (कच्चा माल) आणि एक चारचाकी वाहन असा एकूण ₹१४,४८,६६२ किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या संयुक्त कारवाईत पोलिस विभागाने ९९ गुन्ह्यांची नोंद केली असून, २८४५ लिटर दारू आणि ५६३० लिटर रसायन जप्त केले. या कारवाईची अंदाजित किंमत ₹६,१२,३८२ इतकी आहे. त्याचप्रमाणे राज्य उत्पादन शुल्क विभागाने ३५ गुन्ह्यांची नोंद घेतली असून, त्यांच्या कारवाईत ५४० लिटर दारू, १४५२० लिटर रसायन आणि एक चारचाकी वाहन जप्त करण्यात आले असून त्याची एकूण किंमत ₹८,३६,२८० इतकी आहे. अवैध दारू निर्मिती आणि विक्रीवर रोख बसवण्यासाठी प्रशासनाने उचललेले हे पाऊल जिल्ह्यातील अशा प्रकारच्या गुन्हेगारी प्रवृत्तीवर मोठा आघात करणारे ठरणार आहे.

दरम्यान, जिल्हा प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की, कुठेही अवैध दारू उत्पादन, विक्री किंवा वाहतूक होत असल्याचे निदर्शनास आल्यास त्वरित टोल फ्री क्रमांक 1800-233-9999 किंवा व्हॉट्सॲप क्रमांक 8422001133 वर माहिती द्यावी. नागरिकांनी दिलेली माहिती गोपनीय ठेवण्यात येईल, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

चीनमधून बेदाण्यांची बेकायदा आयात…उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्र सरकारकडे केली पत्राद्वारे ही मागणी

Next Post

ते पैसे नाही, कपडे असतील असे शिरसाट म्हणूच कसे शकतात?..अंजली दमानियांचा सवाल

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
anjali damaniya

ते पैसे नाही, कपडे असतील असे शिरसाट म्हणूच कसे शकतात?..अंजली दमानियांचा सवाल

ताज्या बातम्या

4 1024x773 1

राज्य मराठी चित्रपट पारितोषिक सोहळा उत्साहात संपन्न…या कलाकारांचा झाला सन्मान

ऑगस्ट 6, 2025
Corruption Bribe Lach ACB

३६ हजाराच्या लाच प्रकरणात वन परिक्षेत्र अधिकारीसह दोन जण एसीबीच्या जाळ्यात

ऑगस्ट 6, 2025
IMG 20250805 184256

क्रेडाई नाशिक मेट्रो आयोजित नम: नाशिक – प्रॉपर्टीचा महाकुंभ या तारखे दरम्यान

ऑगस्ट 6, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींना धनलाभाचे संकेत मिळतील, जाणून घ्या, बुधवार, ६ ऑगस्टचे राशिभविष्य

ऑगस्ट 5, 2025
mantralay wallpaper.jpg 1024x575 1

राज्यात या पाच अधिका-यांच्या बदल्या…नाशिक झेडपीच्या सीईओपदी या अधिका-याची नियुक्ती

ऑगस्ट 5, 2025
Screenshot 20250805 190544 WhatsApp 1

नाशिकमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक पूर्वतयारीचा राज्य निवडणूक आयुक्तांनी घेतला आढावा

ऑगस्ट 5, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011