गुरूवार, जून 19, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

बिबट्याच्या हल्ल्यात ७ वर्षीय मुलाचा मृत्यू, वन विभागाला तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश…

by India Darpan
मार्च 6, 2025 | 8:05 pm
in संमिश्र वार्ता
0
IMG 20250306 WA0382

जळगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – यावल तालुक्यातील किनगाव येथे बिबट्याच्या हल्ल्यात एका ७ वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी घडली. ही घटना मौजे साकळी (ता. यावल) येथील शिवारात घडली. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी घडलेल्या दुर्देवी घटनेबाबत दुःख व्यक्त केले आहे. तसेच वन्यप्राण्याच्या हल्यात मृत्यू झाल्यास राज्य शासनाकडून तात्काळ 10 लाखाची मदत दिली जाते. त्या संदर्भातील कार्यवाही तातडीने करण्याचे निर्देश दिले आहेत.

किनगाव येथील शेतकरी केतन सुरेश चौधरी यांच्या मालकीच्या गट क्रमांक ४७२ मध्ये काम करणाऱ्या पेमा बुटसिंग बारेला यांचा मुलगा केश्या पेमा बारेला (वय ७) याच्यावर बिबट्याने दुपारी २ ते २:१५ च्या सुमारास हल्ला केला. या हल्ल्यात केश्या गंभीर जखमी झाला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला.

प्रशासनाची तातडीची पावले
घटनेची माहिती मिळताच यावल वन विभागाचे उपवनसंरक्षक श्री. जमीर शेख, सहायक वनसंरक्षक श्री. प्रथमेश हडपे, तसेच वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी घटनास्थळी भेट दिली. त्यांनी ग्रामस्थ व शेतकऱ्यांशी संवाद साधून आवश्यक सुरक्षा उपायांबाबत मार्गदर्शन केले. वन विभागाने घटनास्थळी तातडीने कॅमेरा ट्रॅप बसवले असून, संपूर्ण परिसराची ड्रोनच्या माध्यमातून पाहणी केली जात आहे. तसेच, पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.

पालकमंत्र्यांचे आदेश आणि उपाययोजना
घटनेची गंभीर दखल घेत जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी यावल वन विभागाला तातडीने कार्यवाहीचे आदेश दिले आहेत. मृत मुलाच्या कुटुंबीयांना त्वरीत १० लाखाची आर्थिक मदत देण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या आहेत. तसेच उर्वरित १५ लाख रूपयाच्या संदर्भात पुढील कार्यवाही करण्याच्या सूचना वन विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहे. तसेच गावकऱ्यांमध्ये जनजागृती करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी संपूर्ण क्षेत्रात विशेष मॉनिटरिंग करण्यात येणार आहे. यासाठी गावात दवंडी देऊन लोकांना सतर्क राहण्याचे आवाहन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले आहे. बिबट्याचा वाढता वावर लक्षात घेता, त्याला जेरबंद करण्यासाठी अधिक गस्त आणि सापळे लावण्यात येणार असल्याची माहिती वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

ई-मेल फसवणुकीच्या प्रकरणाशी नायजेरियन नागरिकाला सीबीआयने केली अटक

Next Post

एकाकी थंडाव्यात वाढ, कशामुळे बदलले हवामान…बघा हवामातज्ञ काय म्हणतात

Next Post
tapman

एकाकी थंडाव्यात वाढ, कशामुळे बदलले हवामान…बघा हवामातज्ञ काय म्हणतात

ताज्या बातम्या

cbi

४५ लाखाचे बनावट बिल…वैद्यकीय अधिका-यासह ८ खाजगी मेडिकल दुकानांच्या मालकांविरुद्ध भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल, सीबीआयची मोठी कारवाई

जून 19, 2025
sepak takra action 00

नाशिकमध्ये या तारखेला सेपक टकरा जिल्हा स्पर्धा आणि निवड चाचणी…

जून 19, 2025
Untitled 58

इस्रायल विरुद्धच्या युद्धात शरणागती पत्करण्याचे अमेरिकेचं आवाहन इराणने फेटाळले

जून 19, 2025
Untitled 57

पतीने बॉयफ्रेंडसोबत पत्नीला हॉटेलमध्ये रंगेहाथ पकडलं, पत्नीने मारली १२ फूट उंच छतावरून उडी…बघा, व्हायरल व्हिडिओ

जून 19, 2025
संग्रहीत फोटो

राज्यात आता दूध भेसळ रोखण्यासाठी लवकरच नवा कायदा…मंत्रालयात झाली बैठक

जून 19, 2025
Untitled 56

डसॉल्ट एव्हिएशनचा रिलायन्सशी करार; फाल्कन २००० जेटसची नागपुरात होणार निर्मिती

जून 19, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011