गुरूवार, जून 19, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

जळगाव जिल्ह्यातील आदिवासी विद्यार्थ्यांनी अनुभवली राष्ट्रपतींसमवेत संस्मरणीय भेट

by India Darpan
डिसेंबर 12, 2024 | 5:29 pm
in स्थानिक बातम्या
0
WhatsApp Image 2024 12 12 at 11.50.28 AM 1536x1023 1


जळगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा)-
जळगाव जिल्ह्यातील शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना केद्रवर्ती अर्थसंकल्प (न्युबयो ) योजनेतुन शैक्षणिक गुणवत्तेला वाव मिळावा या करीता टॅलेट सर्च परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. या परीक्षेमध्ये गुणानुक्रमे प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांना प्रकल्प कार्यालय यावल व दैनिक पुढारी यांच्यावतीने दिल्ली दर्शन व राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची प्रत्यक्ष भेट घडवून आणली.

यामध्ये यावल प्रकल्पात शासकीय माध्यमिक आश्रम शाळा वैजापूर येथील सोनिया बारेला, शासकीय आश्रम शाळा लालमाती शाळेतील शितल बारेला, शासकीय आश्रम शाळा गंगापुरी शाळेतील सुरेश बारेला, शासकीय आश्रम शाळा सार्वेतील श्याम पावरा तसेच विद्यार्थ्यांसमवेत पालक अधिकारी म्हणून वैजापूरच्या अधिक्षिका कुमारी श्वेंता टेंभुर्णी सहभागी झाल्या होत्या.

सर्व विद्यार्थ्यांनी आग्रा येथे ताजमहाल दर्शन व दिल्ली गेट, कुतुबमिनार, लाल किल्ला, राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोग दिल्ली यांची भेट व राजघाट येथिल महात्मा गांधी म्युझियम, राष्ट्रपती भवनातील जनजाती संग्रहालय इत्यादी स्थळांना भेटी दिल्या. राष्ट्रपती भावनात जाऊन महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेत त्यांच्याशी चर्चा केली.

सदर दौरा हा विद्यार्थ्यांसाठी अविस्मरणीय राहील अशी अपेक्षा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यावलचे प्रकल्प अधिकारी अरुण पवार यांनी व्यक्त केली व दरवर्षी अशा स्पर्धात्मक परीक्षांमध्ये उल्लेखनीय यश मिळवून अशा भेटींची संधी प्रत्येकाने मिळवावी, यासाठी चांगल्या प्रकारे अभ्यास करावा या करीता शुभेच्छा दिल्या.

या टॅलेंट सर्च परीक्षा घेण्यासाठी प्रकल्प कार्यालयातील प्रशांत माहुरे, राजेंद्र लवणे, पवन पाटील, सहाय्यक प्रकल्प अधिकारी यावल तसेच व्ही. डी. गायकवाड, एम.डी. पाईकराव, श्रीमती सुलताने मॅडम, एल. एम. पाटील, कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी यावल व विकास पाटील व कृष्णा पाटील व कार्यालयातील इतर कर्मचारी व शाळांमधील मुख्याध्यापक व शिक्षक कर्मचारी यांनी योगदान दिले.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

पंतप्रधान उद्या उत्तर प्रदेश दौऱ्यावर…विकासकामांची पाहणी व कुंभ सहायक चॅटबॉटचे अनावरण करणार

Next Post

नाशिकच्या महिलेस दीड लाखाला गंडा…अशी केली फसवणूक

Next Post
crime1

नाशिकच्या महिलेस दीड लाखाला गंडा…अशी केली फसवणूक

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींचे अपूर्ण कामे पूर्ण होतील, जाणून घ्या, गुरुवार, १९ जूनचे राशिभविष्य

जून 18, 2025
Untitled 53

मुक्त विद्यापीठ ठरले भारतातील पहिले माजी विद्यार्थ्यांची सर्वाधिक नोंदणी असलेले विद्यापीठ…इतकी आहे विद्यार्थीसंख्या

जून 18, 2025
ladki bahin yojana e1722514675247 750x375 1

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ लाभार्थींसाठी सरकारने घेतला आणखी एक मोठा निर्णय…

जून 18, 2025
IMG 20250618 WA0320 1

कोल्हापूर-गोंदिया महाराष्ट्र एक्सप्रेस सुधारित एलएचबी डब्यांसह प्रवाशांच्या सेवेत रुजू…

जून 18, 2025
WhatsApp Image 2025 06 18 at 5.12.48 PM e1750253428522

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचे दर्शन…

जून 18, 2025
nal 11

नाशिक शहराचा पाणीपुरवठा या दिवशी राहणार बंद…दुस-या दिवशी कमी दाबाने पाणी

जून 18, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011