जळगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– जळगावमध्ये गॅस भरतांना सिलेंडरचा स्फोट होऊन ओमिनी गाडी जळून खाक झाल्याची घटना घडली. या घटनेत गॅस भरणारे तीन जण व गाडीमालक गंभीर जखमी झाले आहे.
बेकायदेशीररित्या अवैध पध्दतीने वाहनात गॅस भरतांना ही घटना घडली. या घटनेत दुकान व दुचाकी पूर्णपणे जळून खाक झाले आहे. या आगीच्या दुर्घटनेत भाजलेल्या चारही जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन बंबाने आग आटोक्यात आणली आहे.