जळगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जळगाव जिल्ह्यात मंगळवारी रात्री कारमधून दीड कोटीची रोकड जप्त करण्यात आल्यामुळे खळबळ निर्माण झाली आहे. एरंडोल – पारोळा संघातील कासोदा गावात पोलिसांच्या पथकाने नाकाबंदी दरम्यान ही कारवाई केली आहे.
नाकाबंदी दरम्यान क्रेटा कारची तपासणी केल्यानंतर ही रक्कम सापडली आहे. रात्री उशीरापर्यंत ही रोकड नेमकी कोणाची आणि कशासाठी आणली होती याचा खुलासा झाला नाही. पण, ही रोकड एका बड्या राजकीय नेत्याशी संबधित असल्याची चर्चा आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू झाल्यानंतर पोलिसांनी सर्वच ठिकाणी नाकाबंदी केली आहे. पुण्यात ५ कोटीची रक्कम सापडली होती. त्यानंतर जळगाव जिल्ह्यात ही घटना घडली.