जळगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – डोक्यावर कर्जाचा डोंगर आणि उदरनिर्वाहाचे दुसरे कुठलेही साधन नसल्याने आयुष्य जगायचे कसे या विवंचनेत एकाच कुटुंबातील तीन जणांनी एकाचवेळी आत्महत्या केल्याची घटना जळगाव तालुक्यातील वडली येथे घडली आहे. या घटनेत पतीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
नारायण दंगल पाटील (६६) असे मयत पतीचे नाव आहे. त्यांच्या पत्नी भारती आणि मुलगा गणेश या दोघांची प्रकृती गंभीर आहे. त्यांच्यावर जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरु आहे. या घटनेबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
गुरूवारी सकाळी १० वाजता तिघांनी एकमेकांच्या गळ्यात गळे घालून विषारी औषध प्राशन केले. त्यानंतर त्यांनतर अत्यवस्थ वाटू लागल्यानं गणेशने मित्र श्यामला फोन करून घरी येण्याचे सांगितले. त्यानंतर तिघांनी विष घेतल्याचा प्रकार समोर आला. श्यामने स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने तातडीने तिघांना खासगी वाहनाने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलविले. उपचार सुरु असतांना नारायण दंगल पाटील यांचा उपचारादरम्यान तर त्यांची पत्नी भारती आणि मुलगा गणेश या दोघांची प्रकृती गंभीर आहेत.