मुक्ताईनगर – एकनाथ खडसे यांच्याकडून मला वारंवार टार्गेट करुन त्रास देण्याचे काम सुरु असून हे सर्व मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना भेटून सांगणार असल्याचे शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. सामान्य कुटुंबातील गरीब व्यक्ती आमदार झाल्याने खडसे वैफल्यग्रस्त झाले असून ते महाविकास आघाडीमध्ये मिठाचा खडा टाकत आहे. आता हे सर्व बस झाले..आता त्रास सहन करणार नाही असा पवित्राही त्यांनी घेतला.
तर दुसरीकडे खडसे यांनी सुध्दा आ. पाटील यांच्यावर जोरदार टीका केली. मुक्ताईनगर, संत मुक्ताई मंदिर परिसराच्या विकासासाठी निधीला स्थगिती देण्याचा करंटेपणा आ. पाटील यांनी केल्याचा आऱोपही त्यांनी केला. पाठपुरावा केल्याचे एक तरी पत्र आ. पाटील यांनी दाखवावे असे आव्हान खडसे यांनी दिले.
मुक्ताई मंदिरातील ५ कोटी रुपयांच्या विकास कामाच्या मुद्द्यावरुन पाटील यांनी खडसे यांच्यावर ही टीका केली. त्यानंतर खडसे यांनी सुध्दा त्याला प्रत्तित्युर दिले. खडसे – पाटील वाद हा गेले कित्येक वर्षे सुरु आहे. विशेष म्हणजे दोन्ही नेते महाविकास आघाडीत असल्यामुळे त्यांच्यात हा कलगीतुरा रंगत असतो. पण, यावेळेस दोन्ही नेत्यांनी टोकाची भूमिका घेतली आहे. त्यात आ. पाटील यांनी थेट ठाकरे व पवार यांची भेट घेण्याचे सांगितले आहे.