सोमवार, जून 16, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

राज्यभरात गाजत असलेली जळगाव जिल्हा दूध संघाची निवडणूक अचानक स्थगित

by India Darpan
नोव्हेंबर 29, 2022 | 10:02 pm
in संमिश्र वार्ता
0
BuildingPhoto

विजय वाघमारे, जळगाव
राज्यभरात सध्या गाजत असलेली जळगाव जिल्हा दूध संघाची निवडणूक अचानक पुढे ढकलण्यात आली आहे. पाणी पुरवटा मंत्री गुलाबराव पाटील, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे या तिन्ही दिग्गजांनी या निवडणुकीसाठी जिल्ह्यात ठाण मांडले आहे. या तिन्ही नेत्यांकडून एकमेकांवर विविध प्रकारचे आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. त्यामुळे ही निवडणूक राज्यभरातच चर्चिली जात आहे. अशातच आता ही निवडणूक २० डिसेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आल्याचे वृत्त आहे. निवडणूक पुढं ढकलण्यामागे मोठं राजकारण घडलं का? तसेच पुढील काही दिवसात मोठ्या घडामोडी घडणार का?, या दोन मुद्द्यांवर चर्चांचा बाजार मोठ्या प्रमाणात गरम झाला आहे.

निवडणूक चिन्ह वाटप
जळगाव जिल्ह्यात जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीवरून चांगलाच राजकीय वातावरण तापले असतानाच आता या निवडणुकीला स्थगिती मिळाली आहे. राज्य शासनाने ग्रामपंचायतीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणूकांचा कार्यक्रम २० डिसेंबर पर्यंत स्थगित केला आहे. त्यामुळे जिल्हा दुध संघाच्या निवडणूकीत मतदानाची प्रक्रिया तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे. याबाबत आता निवडणूकीचा पुढील निर्णय 20 डिसेंबरनंतर घेण्यात येणार आहे, असे आदेश राज्य शासनाने नुकतेच काढले आहेत. जिल्हा दुध संघाच्या निवडणूकीच्या प्रक्रियेला वेग आला होता. मंगळवारी अंतिम उमेदवारी यादी आणि निवडणूक चिन्ह वाटप करण्यात आले.

महत्त्वाची कारणे
जळगाव जिल्हा दूध संघाची १० डिसेंबर रोजी होणारी निवडणूक २० डिसेंबरपर्यंत स्थगित करण्यात आलीय. यामागे काही महत्त्वाची कारणे आहेत. राज्यात होऊ घातलेल्या ७ हजार ७५१ ग्रामपंचायतच्या निवडणूक कार्यक्रमामुळे ‘अ’ आणि ‘ब’ दर्जाच्या सहकारी संस्थांच्या निवडणुका या २० डिसेंबरपर्यंत स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सहकार पणन व वस्त्रोद्योग विभागचे सहनिबंधक श्रीकृष्ण वाडेकर यांनी याबाबत आदेश काढले आहेत. त्यांच्या आदेशानुसार आता २० डिसेंबरनंतर निवडणुकीची पुढील तारीख जाहीर होईल. दूध संघाच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्यामुळे आता उमेदवारांना पुढील निवडणूक तारीख जाहीर होण्याची वाट पाहावी लागणार आहे.

काय आहेत शासनाचे आदेश?
राज्यात होऊ घातलेल्या ७ हजार ७५१ ग्रामपंचायतच्या निवडणुकीचा कार्यक्रम सुरू करण्यात आलेला आहे. या कालावधीमध्ये मतदारांनी निवडणुकीत सहभाग जास्तीत जास्त नोंदविण्यात यावा, यासाठी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम ७३ क मधील तरतुदीनुसार शासनास प्राप्त झालेल्या अधिकारात वर्ग “क” वर्ग “ड” तसेच वर्ग “ई” प्रकारच्या सहकारी संस्था त्याचप्रमाणे ज्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या निवडणूक घेण्याचे प्रादेशिक केलेले आहे, अशा सहकारी संस्था वगळून राज्यातील “अ” व “ब” वर्गातील सहकारी संस्थांच्या निवडणुका या आदेशाच्या दिनांकापासून ज्या टप्प्यावर असतील, त्या टप्प्यावर २० डिसेंबर २०२२ पर्यंत पुढे ढकलण्यात येत आहे, असे राज्य शासनाचे आदेश काढले आहे. या आदेशानुसार सहकारी संस्थांच्या निवडणुकांमध्ये जळगाव जिल्हा दूध संघाचा देखील समावेश आहे. आता पुढची मतदानाची प्रक्रिया ही २० डिसेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे जळगाव जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीसाठी १० डिसेंबर रोजी मतदान होणार होते. राज्य शासनाच्या आदेशामुळे आता निवडणूक प्रक्रिया २० डिसेंबरनंतर घेण्यात येणार आहे, असे आदेश विशेष कार्य अधिकारी व सहनिबंधक सहकारी संस्थेचे श्रीकृष्ण वाडेकर यांनी काढले आहे.

मोठ्या राजकीय घडामोडींचे संकेत
निवडणूक रंगात आली असतांना अचानक पुढे ढकलली गेल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांचा बाजार गरम झाला आहे. अगदी पुढील काही दिवसात मोठ्या घडामोडी घडणार असल्याबाबत जळगावच्या सोशल मीडियात वेगवेगळ्या गप्पा हाकल्या जात आहेत. अगदी निवडणुकीपूर्वी मोठा हायव्होल्टेज राजकीय ड्रामा घडणार असल्याची देखील चर्चा असून यातून विरोधकांना कमजोर करण्याचा उद्देश असून यासाठीच ही खेळी खेळली गेल्याचे देखील बोलले जात आहे. परंतू निवडणूक पुढे ढकलण्यामागे फक्त प्रशाकीय कारण असल्याचे तूर्त तरी समोर आले आहे. परंतू काही दिवसात मोठ्या राजकीय घडामोडी घडणार असल्याची चर्चा काही जण करत आहेत. पण अद्याप तरी ठोस काहीही कारण समोर आलेले नाही.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

या व्यक्तींचा आज मोठा आर्थिक व्यवहार लागेल मार्गी; जाणून घ्या, बुधवार, ३० नोव्हेंबरचे राशिभविष्य

Next Post

देवी सरस्वतीविषयी केलेल्या वक्तव्याबाबत छगन भुजबळ म्हणाले…

Next Post
IMG 20221129 WA0026

देवी सरस्वतीविषयी केलेल्या वक्तव्याबाबत छगन भुजबळ म्हणाले...

ताज्या बातम्या

1000699613

असा आहे नवीन महाबळेश्वर गिरिस्थान क्षेत्र विकास आराखडा…उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आढावा

जून 16, 2025
Screenshot 20250616 064516 Facebook 1

नाशिक येथील द्वारका सर्कल वरील सर्व अतिक्रमण काढले…

जून 16, 2025
Untitled 39

चारधाम यात्रेसाठी या उड्डाणांवर तात्काळ प्रभावाने स्थगिती…दोन्ही वैमानिकांचे परवाने सहा महिन्यांसाठी निलंबित

जून 16, 2025
Untitled 41

चाळीसगाव तालुक्यात वीज पडून तिघांचा मृत्यू, एकजण जखमी

जून 16, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी कोणत्याही भूलथापांना बळी पडू नये, जाणून घ्या, सोमवार, १६ जूनचे राशिभविष्य

जून 15, 2025
DEVENDRA

शाळा प्रवेशोत्सव…पहिल्या दिवशी मुख्यमंत्र्यांसह मान्यवर करणार विद्यार्थ्यांचे स्वागत…

जून 15, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011