चाळीसगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – ५० हजार रुपयाची लाचेची मागणी करणारे जळगाव जिल्हा परिषदेचे तत्कालिन आरोग्य अधिकारी व सध्या जिल्हा क्षयरोग अधिकारी डॅा. देवराम किसन लांडे हे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकले आहे. लांडे यांना ताब्यात घेतले असून त्यांचे विरूध्द चाळीसगाव शहर पोलीस स्टशनमध्ये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. विशेष म्हणजे जुनमध्ये ही लाच मागितली होती. पण, त्यानंतर ते सावध झाले. पण, लाचेची मागणी केल्याप्रकरणी ते जाळ्यात अडकले.
या कारवाईबाबत एसीबीने दिलेली माहिती अशी की, तक्रारदार यांनी त्यांचे घर व जागा भाडेतत्त्वावर आरोग्य विभागाच्या आरोग्यवर्धिनी केंद्राकरिता भाड्याने देण्याबाबत आरोग्य विभाग, जिल्हा परिषद जळगाव येथे अर्ज सादर केला होता. तक्रारदार यांची जागा आरोग्य विभागाकडून भाडेतत्त्वावर घेवून त्यांना नियमित भाडे सुरू करण्याकरिता डॉ देवराम लांडे, DHO जळगाव (तत्कालिन) यांनी तक्रारदार यांचेकडून पंचासमक्ष ५० हजार रुपये लाचेची मागणी केल्याने त्यांना ताब्यात घेतले असून त्यांचे विरूद्ध चाळीसगाव शहर पोलीस स्टशनमध्ये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
लाच मागणी कारवाई
*आरोपी – लोकसेवक डॉ. देवराम किसन लांडे, वय 52 वर्षे, तत्कालीन जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, जळगाव. (सध्या नेमणूक जिल्हा क्षयरोग अधिकारी, जळगाव तसेच तालुका आरोग्य अधिकारी पाचोरा जि. जळगाव.)
*लाचेची मागणी- 50,000/-₹
*लाचेची मागणी दिनांक– ता.22/06/2023
सापळा अधिकारी:-
अभिषेक पाटील, पोलीस उपअधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, धुळे. मो. 8888881449
सापळा पथक –
पो नि रूपाली खांडवी, पोहवा राजन कदम, शरद कटके, पोशि संतोष पावरा, मकरंद पाटील, रामदास बारेला, गायत्री पाटील चालक पोहवा सुधीर मोरे, सर्व लाप्रवि धुळे
मार्गदर्शक –
मा.शर्मिष्ठाजी घारगे-वालावलकर मॅडम, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक मो. नंबर- 9371957391
मा. माधव रेड्डी सो, अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक. मो. नंबर- 9404333049
श्री. नरेंद्र पवार, वाचक पोलीस उपअधीक्षक, ला.प्र.वि. नाशिक परिक्षेत्र, नाशिक. मो. नंबर 9822627288
सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की,त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी कींवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ संपर्क साधावा.
टोल फ्रि क्रं.1064
Jalgaon Health Officer Bribe Corruption ACB Trap Crime
A case has been filed against the health tuberculosis officer who demanded a bribe of Rs 50,000