गुरूवार, जुलै 3, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

जळगाव जिल्ह्यातील गोद्री येथे होणार अखिल भारतीय हिंदू गोर बंजारा आणि लबाना-नायकडा समाज कुंभ

by India Darpan
नोव्हेंबर 15, 2022 | 5:18 am
in राज्य
0
Fhh GCCVUAAJkmZ e1668438659837

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जळगाव जिल्ह्यातील गोद्री येथील अखिल भारतीय हिंदू गोर बंजारा आणि लबाना-नायकडा समाज कुंभ २०२३ साठी देशभरातून अंदाजे 50 ते 60 हजार भाविक अपेक्षित आहेत. येणाऱ्या भाविकांसाठी सर्व व्यवस्था चोखपणे करावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील गोद्री येथे होणाऱ्या ‘अखिल भारतीय हिंदू गोर बंजारा आणि लबाना-नायकडा समाज कुंभ २०२३’ बाबत सह्याद्री अतिथगृह येथील पूर्वतयारी बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते.

बैठकीला ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, औषध प्रशासन मंत्री संजय राठोड, ग्रामविकास विभागाचे अपर मुख्य सचिव राजेश कुमार, प्रधान सचिव (परिवहन) पराग जैन नानोटिया, प्रधान सचिव (ऊर्जा) दिनेश वाघमारे, अन्न व प्रशासनचे (आयुक्त) अभिमन्यू काळे, उपमुख्यमंत्री यांचे सचिव डॉ.श्रीकर परदेशी, बांधकाम विभागाचे सचिव एस. एस.साळुंखे, जळगावचे जिल्हाधिकारी अमन मित्तल, जळगावचे जिल्हा पोलीस अधिक्षक एम.राजकुमार, जिल्हा परिषद जळगावचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.पंकज आशिया यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

श्री.फडणवीस म्हणाले की, या कार्यक्रमासाठी देशभरातून हजारो भाविक येतील. त्यामुळे कार्यक्रम स्थळी पायाभूत सुविधा चोख असाव्यात. त्यासाठी सर्व प्रशासकीय यंत्रणांनी उत्तम नियोजन करावे. या कार्यक्रमाच्या नियोजनातील सर्व विभागांतील कामांच्या समन्वयासाठी जिल्ह्याचे पालक सचिव यांच्या अध्यक्षतेखाली समिती करावी. हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडून भाविकांना एक चांगला अनुभव घेता आला पाहिजे, अशा सुविधा सर्व यंत्रणांनी द्याव्यात. सार्वजनिक बांधकाम विभाग, पाणीपुरवठा विभाग, ऊर्जा विभाग, ग्रामविकास विभाग, गृह विभाग यांनी त्यांना दिलेल्या जबाबदारी पार पाडाव्यात. कोणत्याही प्रकारची अडचण आल्यास नियोजन समितीमार्फत त्या सोडविण्यात येतील.

श्री.फडणवीस म्हणाले की, गोद्री येथे जाणारे प्रमुख मार्ग, रस्त्यांची कामे सावर्जनिक बांधकाम विभागाने त्वरित हाती घेवून पूर्ण करावीत. गोद्री गावात हेलिपॅड तयार करणे, अतिक्रमण काढणे ही कामे प्राधान्याने पूर्ण करावीत. पिण्याचे पाणी, स्नानगृह, सांडपाणी व्यवस्था करावी. ऊर्जा विभागाने या ठिकाणी नवीन व तात्पुरत्या स्वरुपात ट्रान्सफॉर्मर लावणे, विजेच्या उपक्रेंद्राची क्षमता वाढविणे, सुरक्षिततेच्या उपाययोजना करणे या कामाला प्राधान्य द्यावे. परिवहन विभागाने कुंभस्थानी तसेच गोद्री येथे जाण्यासाठी जादा बसेस सोडाव्यात व गर्दी होऊ नये यासाठी वाहतूकीचे नियोजन करावे. ग्रामविकास विभागाने महिला बचतगटांचे स्टॉल्स लाववावेत, वैद्यकीय सुविधा, कायदा व सुव्यवस्था देखील चोख ठेवावी.
अखिल भारतीय हिंदू गोर बंजारा आणि लबाना-नायकडा समाज कुंभ २०२३ साठी जिल्हा परिषद जळगावचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी प्रशासनाने केलेल्या तयारीबाबत सादरीकरण केले.

#जळगाव जिल्ह्यातील #गोद्री येथील अखिल भारतीय हिंदू गोर बंजारा आणि लबाना-नायकडा समाज कुंभ २०२३ साठी देशभरातून अंदाजे ५० ते ६० हजार भाविक अपेक्षित आहेत. येणाऱ्या भाविकांसाठी सर्व व्यवस्था चोखपणे करावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री @Dev_Fadnavis यांनी पूर्वतयारी आढावा बैठकीत दिले. pic.twitter.com/IU7IDR5JNH

— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) November 14, 2022

Jalgaon Godri Banjara Kumbha 2023
Jamner DYCM Devendra Fadanvis Girish Mahajan

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

८ बँक खाते…. सोना… हिरे…. आणि बरंच काही… डिंपल यादव यांच्याकडे आहे एवढी संपत्ती

Next Post

दीड तासांच्या युक्तीवादानंतर दिल्ली उच्च न्यायालयाने घेतला हा निर्णय; ठाकरेंना दिलासा की दणका?

India Darpan

Next Post
Uddhav Thackeray1

दीड तासांच्या युक्तीवादानंतर दिल्ली उच्च न्यायालयाने घेतला हा निर्णय; ठाकरेंना दिलासा की दणका?

ताज्या बातम्या

fir111

हॉस्पिटल बाबत तक्रार असल्याची धमकी देत डॉक्टरकडे पाच लाखाची खंडणीची मागणी…गुन्हा दाखल

जुलै 3, 2025
Screenshot 20250703 150541 Collage Maker GridArt

नाशिकमधील या नेत्यांनी आज भारतीय जनता पार्टीमध्ये केला प्रवेश…बघा, अधिकृत नावे

जुलै 3, 2025
Rahul Gandhi

३ महिन्यांत महाराष्ट्रात ७६७ शेतकऱ्यांची आत्महत्या, ही आकडेवारी नाही तर उद्ध्वस्त घरे…राहुल गांधी यांची पोस्ट

जुलै 3, 2025
IMG 20250703 WA0179 1

ब्रँडेड एक्सचेंज फेस्टिव्हल… जुने कपडे आणा, नवे ब्रँडेड कपडे न्या !

जुलै 3, 2025
Gu6RydgXEAE8ag e1751527545356

शिवसेना ठाकरे गटाच्या नाशिक महानगर प्रमुखपदी प्रथमेश गीते यांची नियुक्ती…सुनील बागुल यांची हकालपट्टी

जुलै 3, 2025
bjp11

नाशिकमध्ये ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का….या पदाधिका-यांचा भाजपमध्ये प्रवेश

जुलै 3, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011