जळगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सोनी मराठी वाहिनीने प्रेक्षकांना पुन्हा एकदा करोडपती होण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. ‘आता मागे नाही राहायचं’, असं सांगत ’कोण होणार करोडपती’ हा लोकप्रिय कार्यक्रम स्पर्धकांसाठी एक नाही तर तब्बल २ करोड रुपये जिंकण्याची संधी घेऊन आला आहे. म्हणजेच ‘कोण होणार करोडपती’ कार्यक्रमात आता बक्षिसाची रक्कम दुप्पट झाली आहे. प्रश्नोत्तरांच्या या मनोरंजक खेळात सुप्रसिद्ध अभिनेते सचिन खेडेकर यांचे दमदार निवेदन आणि दिलखुलास संवादकौशल्य प्रेक्षकांना पुन्हा एकदा अनुभवता येणार आहे. जळगावची किरण बोरसे १५ जून रोजी हॉट सीट वर बसणार आहे तेव्हा पहायला विसरु नका ‘कोण होणार करोडपती’ सोम. ते शनि., रात्री ९ वाजता फक्त सोनी मराठी वाहिनीवर.
निरनिराळ्या क्षेत्रांतले स्पर्धक ‘ कोण होणार करोडपती’ च्या मंचावर पाहायला मिळतात. या पर्वात सहभागी होण्यासाठी तब्बल १४ लाख स्पर्धकांनी नोंदणी केली होती. पुढील नोंदणी प्रक्रियेला सामोरे जात त्यांतून काही स्पर्धक निवडले गेले. आपली स्वप्नपूर्ती व्हावी या आशेने हे प्रेक्षक या खेळाचा भाग होतात. मूळची जळगाव ला राहणारी आणि स्थायिक असलेली किरण बोरसे ह्या हॉट सीटवर येणार आहे.
किरण बीएससी रसायनशास्त्रात शिक्षण पूर्ण केले आहे. किरण च्या कुटुंबात एकूण ६ सदस्य आहेत. किरण कॉलेज मध्ये टॉपर होती. अभ्यासात अतिशय हुशार असल्याने ती कोण होणार करोडपती या या शो मध्ये येऊन आपले नशीब आजमावत आहे. सचिन खेडेकर यांच्यासोबत रंगलेल्या तिच्या गप्पा नक्कीच प्रेक्षकांना आवडतील. आता कोण होणार करोडपती च्या हॉट सीटवर आल्यावर किरण कशाप्रकारे खेळते आणि करोडपती व्हायचे तिचे स्वप्न पूर्ण करते का हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.
किरण ला नव्या पर्वात हॉट सीटवर येण्याची संधी मिळाली आहे. आता हॉट सीटवर आल्यावर किरण कशी आणि किती रक्कम जिंकून जाते हे पाहणे जळगावकरांसाठी उत्सुकतेचं ठरणार आहे. पाहायला विसरू नका कोण होणार करोडपती गुरुवारी रात्री ९ वाजता सोनी मराठी वाहिनीवर.
Jalgaon Girl Kon Honar Carorpati Show