पाचोरा (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अडचणीत असलेल्या शेतकऱ्याला कुठूनच दिलासा मिळत नाही. पीक कर्ज घेतले आणि त्याची सातबाऱ्यावर नोंद करण्यासाठीही लाच मागितली जाते. लाचलुचत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) कारवाईतून हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. तालुक्यातील लासगाव येथे तलाठी कार्यालयाचा खासगी एजंट १३६० रुपयांची लाच घेताना सापडला आहे.
एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, भगवान दशरथ कुंभार (वय ४४ वर्ष, रा.बांबरुड, ता.पाचोरा जि.जळगाव) असे या लाचखोर एजंटचे नाव आहे. एका शेतकऱ्याची लासगाव शिवारात शेती आहे. मात्र, ही शेती त्याच्या आईच्या नावे (शेत गट क्रं.१२८/ब/१ हीचे क्षेत्र ०.९१ हेक्टर आर चौ.मी क्षेत्र) आहे. या शेतजमीनीवर या शेतकऱ्याने आईच्या नावे बँक ऑफ बडोदा शांखा, सामनेर या बँकेकडून १,३०,०००/-रुपयांचे पीककर्ज घेतले. या मंजूर पिककर्जाचा बोझा शेतजमीनीच्या ७/१२ उताऱ्यावर घेण्यासाठी हा शेतकरी बांबरुड तलाठी कार्यालयात गेलेा.
तलाठी कार्यालयात असलेल्या कुंभार याने या शेतकऱ्याशी संवाद साधला. माझे तलाठी अप्पांशी चांगले संबंध आहेत. पीककर्जाचा बोझा शेतजमीनीचे ७/१२ उताऱ्यावर लावण्याचे काम तलाठी अप्पांकडून करून आणून देतो. असे सांगून कुंभार याने आधारकार्ड झेरॉक्स व आईचे ३ व तक्रारदार यांचे २ यासपोर्ट फोटो मागितले. या कामासाठी १३६० रुपयांची लाच मागितली. त्यानंतर या शेतकऱ्याने एसीबीकडे तक्रार केली. त्यानंतर एसीबीने सापळा रचला. आणि कुंभार हा त्याच्या घरी १३६० रुपयांची लाच घेताना रंगेहात सापडला. याप्रकरणी पाचोरा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात येत आहे.
सापळा पर्यवेक्षण अधिकारी-*
श्री.शशिकांत पाटील, पोलिस उप अधीक्षक,ला.प्र.वि. जळगांव.8766412529
*सापळा व तपास अधिकारी-*
श्रीमती.एन.एन.जाधव,पोलिस निरीक्षक, ला.प्र.वि. जळगांव.8691824333
*सापळा पथक-*
पो.ना.ईश्वर धनगर, पो.कॉ.राकेश दुसाने.
*कारवाई मदत पथक-*
PI.श्री.संजोग बच्छाव,लाप्रवि जळगाव मोबा.नं.9823128038
स.फौ.दिनेशसिंग पाटील, स.फौ.सुरेश पाटील, पो.हे.कॉ.सुनिल पाटील, पो.हे.कॉ.रविंद्र घुगे, पो.ना.जनार्दन चौधरी, पो.ना.किशोर महाजन, पो.ना.सुनिल वानखेडे, पो.ना.बाळु मराठे, पो.कॉ.अमोल सुर्यवंशी, पो.कॉ.प्रणेश ठाकुर.
मार्गदर्शक-*
*1)* मा.श्रीमती शर्मिष्ठा घारगे-वालावलकर मॅडम, पोलीस अधीक्षक , ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक. मोबा.नं. 91 93719 57391
*2)* मा.श्री.एन.एस.न्याहळदे साो., अप्पर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक मोबा.नं. 9823291148
*3)* मा.श्री.नरेंद्र पवार साो., वाचक पोलीस उप अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक. मोबा.नं. 9822627288
*सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की, त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ संपर्क साधावा.*
अँन्टी करप्शन ब्युरो,जळगाव. अल्पबचत भवन, जिल्हाधिकारी कार्यालय आवार, जळगांव
*@ दुरध्वनी क्रं. 0257-2235477*
*@ मोबा.क्रं. 8766412529*
*@ टोल फ्रि क्रं. 1064*
Jalgaon Farmer Bribe Corruption Trap ACB