जळगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शिक्षण विभागाला लाचखोरीने किती ग्रासले आहे याची अनेक उदाहरणे दिवसागणिक समोर येत आहेत. नाशिकच्या दोन शिक्षणाधिकारी यापूर्वीच लाच घेताना रंगेहात पकडल्या गेल्या आहेत. आता शिक्षण संस्थेच्या अध्यक्षासह मुख्याध्यापक आणि लिपिक जाळ्यात अडकले आहेत. विशेष म्हणजे, सर्वसाधारणपणे रोखीने लाच घेतली जाते. मात्र, या धेंडांची हिंमत आता एवढी वाढली आहे की त्यांनी थेट चेकनेच ७५ हजाराची लाच स्वीकारली आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) दिलेल्या माहितीनुसार, विनोद शंकर जाधव (वय ४२ वर्ष, मुख्याध्यापक, महात्मा फुले हायस्कुल, एरंडोल), नरेंद्र उत्तम वाघ (वय ४४ वर्ष, कनिष्ठ लिपीक, महात्मा फुले हायस्कुल, एरंडोल), विजय पंढरीनाथ महाजन (वय ५६ वर्ष, अध्यक्ष श्री. सावता माळी शिक्षण प्रसारक मंडळ, जळगाव संचलित महात्मा फुले हायस्कुल, एरंडोल) अशी तिघा लाचखोरांची नावे आहेत.
श्री. सावता माळी शिक्षण प्रसारक मंडळ, जळगाव संचलित महात्मा फुले हायस्कुल, एरंडोल येथे उपशिक्षक या पदावर कार्यरत असलेल्या दोघांची दोघांची बदली दि.०१/०४/२०२३ रोजी एरंडोल हायस्कूल येथून महात्मा फुले हायस्कुल, धरणगाव येथे करण्यात आली. याबाबतचा मंजुरीसाठीचा प्रस्ताव दि.०२/०५/२०२३ रोजी शिक्षणाधिकारी, माध्यमिक शिक्षण विभाग, जिल्हा परिषद जळगाव यांचे कडे पाठविण्यात आला. या बदलीस स्थगिती मिळणेसाठी व पाठवलेला मंजुरी प्रस्ताव रद्द करण्यात यावा अशा आशयाचे संस्थेचे पत्र शिक्षणाधिकारी, माध्यमिक शिक्षण विभाग,जिल्हा परिषद जळगाव यांना देणे आवश्यक होते. याच कामासाठी लाचखोर मुख्याध्यापक आणि लिपिकाने दोन्ही उपशिक्षकांकडे लाच मागितली. स्वतःसाठी आणि संस्थेचा लाचखोर अध्यक्ष यांच्यासाठी दोघांनी पुर्ण महिन्याचा एक पगार म्हणजेच ७५,०००/-रुपये चेक स्वरूपाने लाच म्हणून द्यावे, असे सांगितले.
याप्रकरणी एसीबीकडे तक्रार आली. त्यानंतर एसीबीने सापळा रचला. सांगितल्याप्रमाणे पूर्तता करण्यास सांगून लाच प्राप्त करण्याचा प्रयत्न करून संस्था अध्यक्षाने प्रोत्साहन दिले. मागणी केल्याप्रमाणे ७५,०००/-रू.चा मुख्याध्यापक यांचे नावे असलेला चेक लाचखोर जाधव याने स्विकारला आणि तो त्याला रंगेहात पकडण्यात आले. याप्रकरणी तिघांवर एरंडोल पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात येत आहे.
सापळा पर्यवेक्षण अधिकारी-*
श्री.शशिकांत पाटील, पोलिस उप अधीक्षक,ला.प्र.वि. जळगांव. मोबा.नं.8766412529
*सापळा व तपास अधिकारी-*
एन.एन.जाधव,पोलिस निरीक्षक, ला.प्र.वि. जळगांव. मोबा.नं. 869182433
सापळा पथक-*
पो.हे.कॉ.सुनिल पाटील, पो.हे.कॉ.रविंद्र घुगे, पो.ना.ईश्वर धनगर, पो.कॉ.सचिन चाटे.
कारवाई मदत पथक-*
श्री.एस.के.बच्छाव,पोलिस निरीक्षक, ला.प्र.वि. जळगांव. मोबा.नं.98231 28038
स.फौ.दिनेशसिंग पाटील, स.फौ.सुरेश पाटील, म.पो.हे.कॉ. शैला धनगर, पो.ना.किशोर महाजन, पो.ना.सुनिल वानखेडे, पो.ना.बाळु मराठे, पो.कॉ.प्रदिप पोळ, पो.कॉ.राकेश दुसाने, पो.कॉ.अमोल सुर्यवंशी, पो.कॉ.प्रणेश ठाकुर.
मार्गदर्शक-*
*1)* मा.श्रीमती शर्मिष्ठा घारगे-वालावलकर, पोलीस अधीक्षक , ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक. मोबा.नं. 91 93719 57391
*2)* मा.श्री माधव रेड्डी अप्पर पोलिस अधिक्षक ,ला प्र वि नाशिक परिक्षेत्र नाशिक मो नं 9404333049
*2)* मा.श्री.नरेंद्र पवार साो., वाचक पोलीस उप अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक. मोबा.नं. 9822627288
*सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की, त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ संपर्क साधावा.*
अँन्टी करप्शन ब्युरो,जळगाव. अल्पबचत भवन, जिल्हाधिकारी कार्यालय आवार, जळगांव
*@ दुरध्वनी क्रं. 0257-2235477*
*@ मोबा.क्रं. 8766412529*
*@ टोल फ्रि क्रं. 1064*
Jalgaon Education Department Bribe Corruption ACB Trap