जळगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पहिल्या श्रावण सोमवारी घडलेल्या दुर्घटनेने एकाच कुटुंबातील तीन तरुण पाण्यात बुडाले आहेत. या तिघांपैकी दोघांचे मृतदेह सापडले असून एकाचा शोध एसडीआरएफचे पथक घेत आहेत. जळगाव तालुक्यातील रामेश्वर तीर्थावर सोमवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास घडली. या दुर्घटनेने जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे.
श्रावण सोमवारनिमित्त एरंडोल शहरातील ५० तरुणांचा एक गट रामेश्वर तीर्थावर कावडयात्रा घेऊन दर्शनासाठी गेला होता. गिराणा, तापी आणि अंजनी नदीच्या त्रिवेणी संगमावर रामेश्वर महादेव मदिर आहे. येथेच हे तरुण गेले होते. येथे दर्शन घेऊन दुपारी साडेतीन वाजता पियुष रवी शिंपी (२३), सागर अनिल शिंपी (२३), अक्षय प्रवीण शिंपी (२२) पोहण्यासाठी तापी नदीत उतरले. त्यावेळी पाण्याचा अंदाज आला न आल्यामुळे तिघेही पाण्यात बुडाले. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलिस आणि धुळे येथील एसडीआरएफचे पथक दाखल झाले. त्यानंतर शोध सुरु झाला. यात दोघांचे मृतदेह हाती लागले.
Jalgaon District Tapi River 3 Drown Rameshwar Tirtha