रविवार, ऑक्टोबर 12, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

दर शनिवारी मारुतीच्या दर्शनाला जायचे… रस्ते अपघातात चुलतभावांचा मृत्यू… जळगाव जिल्ह्यातील दुर्दैवी घटना…

ऑगस्ट 27, 2023 | 11:41 am
in संमिश्र वार्ता
0
IMG 20230827 WA0135 1 e1693114826815

जळगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जिल्ह्यातील शिरसाळा मारुती मंदिरात दर्शनासाठी जाणाऱ्या दोघांचा रस्ते अपघातात मृत्यू झाला आहे. भरधाव ट्रकने दुचाकीस जबर धडक दिल्याने हा अपघात झाला आहे. बोहर्डीजवळील बाबा ढाब्यासमोर हा अपघात झाला. याप्रकरणी अज्ञात ट्रक चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भास्कर कुंभार व लखन कुंभार (रा. सावदा) अशी मृतांची नावे आहेत. ते चुलत भाऊ आहेत.

रावेर तालुक्यातील सावदा येथील चार मित्र नित्यनियमाने शनिवारी शिरसाळा मारोती दर्शन जात होते. त्यात भूषण किशोर पुर्भी (रा.चांदणी चौक, सावदा), भूषण चंद्रकांत कुंभार, भास्कर पांडुरंग कुंभार, लखन पंकज कुंभार तीथे (रा. इंदिरा गांधी चौक, सावदा) या चार मित्रांचा समावेश आहे. हे चारही मित्र सकाळी पाच वाजता शिरसाळा ता. बोदवड येथे निघाले. सकाळी ६.१५ च्या सुमारास महामार्गावरील बोहर्डी (ता. भुसावळ) येथे वाचा ढाच्यासमोर आले. त्याचवेळी मोटरसायकल (होंडा ड्रीम युगा क्रमांक एम एच १९. डी एम ८७८९) यावरील चालक भास्कर पांडुरंग कुंभार व त्याच्या पाठीमागे बसलेला लखन पंकज कुंभार यांना अज्ञात ट्रकने मागून धडक दिली. ही ट्रक भरधाव वेगाने मुक्ताईनगर कडे गेली. या अपघातावेळी मोठा आवाज झाला. त्यामुळे दुसऱ्या दुचाकीवरील भूषण पूर्वे आणि भूषण चंद्रकात कुंभार यांनी मागे वळून पाहिले. आपल्या मित्रांचा अपघात झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी तत्काळ अपघातस्थळी धाव घेतली. भास्कर कुंभार यास जबर मार लागला होता तर लखन याच्या पायाला व छातीला दुखापत झाली. यावेळी बोहडी ग्रामस्थांनीही मदतकार्यासाठी धाव घेतली.

दोघे जखमींना रिक्षातून वरणगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, भास्कर कुंभार याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकिय अधिकारी डॉ. क्षितीजा हेडवे यांनी सांगितले. तर, लखन कुंभार यास तात्काळ भुसावळ रिंदम हॉस्पिटल येथे हलविण्यात आले. मात्र, उपचार सुरू असतानाच लखनचाही मृत्यू झाला. याप्रकरणी भूषण पूर्भी याच्या तक्रारीवरुन अज्ञात ट्रक चालकाविरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरिक्षक आशिष कुमार आडसूळ यांचे मार्गदर्शनाखाली उप पोलिस निरिक्षक परशुराम दळवी, पोहे का प्रशांत ठाकुर करीत आहे.

सावदा येथे एकाच वेळी अंत्यसंस्कार
बोदवड तालुक्यातील शिरसाळा मारोती मंदिर जागृतस्थान असून शनिवार या दिवशी जळगाव जिल्ह्यातून भाविक मोठया संख्येने देवदर्शन घेण्यासाठी छोटया मोठया वाहनाने जात असतात. मंदिराच्या परिसरात यात्रेचे स्वरूप येते. शनिवार रोजी सावधाचे चौघे मित्र दोन मोटरसायकलवर शिरसाळा मारोती येथे जात असतांना अज्ञात ट्रकचालकाने त्यांच्या मोटरसायकला धडक दिली. त्यात दोघांचा मृत्यू झाला. दोघांवर एकाच वेळी सावदा स्मशानभूमीत अत्यंस्कार करण्यात आले.

Jalgaon District Road Accident Brother Death
Savda Bodvad Maruti Temple Varangaon Crime Truck Two Wheeler

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

त्र्यंबकेश्वरला आलेल्या भाविकांच्या कारचा अपघात… ५ जखमी

Next Post

अजित पवारांवरील वक्तव्याने भगतसिंह कोश्यारी चर्चेत… बघा, नेमकं काय म्हणाले ते

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

प्रातिनिधीक फोटो
मुख्य बातमी

नाशिककरांनो, चक्क १४२ कोटींच्या ठेवी पडून… पैसे मिळविण्यासाठी तातडीने हे करा…

ऑक्टोबर 11, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा शनिवारचा दिवस… जाणून घ्या ११ ऑक्टोबरचे राशिभविष्य…

ऑक्टोबर 11, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा १० ऑक्टोबरचा दिवस… जाणून घ्या शुक्रवारचे राशिभविष्य

ऑक्टोबर 10, 2025
notes
मुख्य बातमी

बँकांकडे तब्बल १६३ कोटी रुपयांच्या ठेवी पडून… त्यात तुमची तर नाही ना? फक्त हे करा, लगेच मिळतील पैसे…

ऑक्टोबर 10, 2025
mahavitarn
स्थानिक बातम्या

७ वीज कर्मचारी संघटनांचा संप, वीजपुरवठ्यासाठी महावितरण सज्ज, ‘मेस्मा’ लागू

ऑक्टोबर 9, 2025
rape2
क्राईम डायरी

अल्पवयीन मुलीवर बलात्कार…गुन्हा दाखल

ऑक्टोबर 9, 2025
crime1
क्राईम डायरी

कॉलेजरोड कंपनीचे शोरूम फोडून पावणे सतरा लाखाच्या ऐवजावर चोरट्यांचा डल्ला

ऑक्टोबर 9, 2025
cbi
संमिश्र वार्ता

लाचखोरी प्रकरणात सीबीआयने मुंबईतील सीजीएसटी अधीक्षक आणि निरीक्षकांना केली अटक

ऑक्टोबर 9, 2025
Next Post
Bhagat Singh Koshyari

अजित पवारांवरील वक्तव्याने भगतसिंह कोश्यारी चर्चेत... बघा, नेमकं काय म्हणाले ते

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011