जळगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – संतापाच्या भरात कोण काय करेल याचा नेम नाही. असाच एक प्रकार जिल्ह्यातील पारोळा तालुक्यात घडला आहे. कुत्र्याने ट्रॅक्टरचे सीट फाडले हेच निमित्त झाले. संतप्त ट्रॅक्टरचालकाने त्या कुत्र्याला ट्रॅक्टर ट्रॉलीला बांधले. त्यानंतर त्याला फाशी दिली. आणि नंतर नाल्यात फेकून दिले. या घटनेच्या विरोधात प्राणी प्रेमींमध्ये संतापाचे वातावरण आहे.
पारोळा तालुक्यातील बहादरपूर ही घटना घडली आहे. कुत्र्याने ट्रॅक्टरचे सीट फाडले. त्यामुळे रागाच्या भरात ट्रॅक्टर चालकाने कुत्र्याला बेदम मारहाण केली. त्याला ट्रॅक्टरच्या ट्रॉलीला दोरीने बांधून मारुन टाकल्याची घटना घडली. या घटनेनंतर प्राणी मित्रांमधून संताप व्यक्त केला जात असून या कृत्याचा निषेधही केला जात आहे. या घटनेची गंभीर दखल घेत पारोळा पोलीस स्थानकाने वन्यजीव संरक्षण अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
विशेष म्हणजे हा कुत्रा रोज ट्रॅक्टरखाली बसून ट्रॅक्टरची राखण करत होता. त्याने एकदाच ट्रॅक्टरचे सीट फाडल्यानंतर दिलीप भिमराव पारधी याला प्रचंड राग आला. त्याने या काळ्या रंगाच्या कुत्र्याला अगोदर बेदम मारहाण केली. नंतर ट्रॅक्टरच्या ट्रॉलीवरील लोखंडी अँगलला दोरीच्या सहाय्याने लटकवून फाशी दिली. यानंतर कुत्र्याला ट्रॅक्टरला बांधून ओढत फरफतट नेत नाल्यात फेकून दिले. याअगोदरही प्राण्यांवर अत्याचार करणा-या अनेक घटना घडल्या. पण, केवळ सीट फाडले म्हणून त्या रागातून असे भयानक कृत्य करणे हे माणूसकीला काळीमा फासणारे आहे. या घटनेमुळे प्राणी मित्र आक्रम झाले आहे. ठिकठिकाणी या घटनेबद्दल संताप व्यक्त केला जात आहे.
Jalgaon Crime Dog Tractor Seat Anger
Murder Killed Animal District Parola Bahadarpur