जळगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जिल्ह्यातील धरणगाव येथील नायब तहसिलदार आणि पाळदी तलाठी कार्यालयातील कोतवाल हे दोघे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) सापळ्यात अडकले आहेत. नायब तहसिलदार जयवंत भट (वय ५१) आणि कोतवाल राहुल शिरोळे (वय ३०) अशी या दोघा लाचखोरांची नावे आहेत. या दोघांनी ३० हजाराची लाच मागितली होती. अखेर तडजोडी अंती २५ हजाराची लाच या दोघांनी स्विकारली. हे दोघेही एसीबीच्या सापळ्यात रंगेहाथ सापडले आहेत. याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करुन पुढील कार्यवाही सुरू आहे.
एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांचे भावाचे नावे दोन ढंपर वाहन असुन सदर ढंपर वाहनाने ते वाळू वाहतुकीचा व्यवसाय करतात. दोन ढंपर वाहनांपैकी एक ढंपर वाहन हे एरंडोल तहसिल कार्यालय येथे जमा आहे. तसेच यापूर्वी देखील ढंपर अडवून जागेवरच सोडून देण्यासाठी तक्रारदार यांचेकडून दि.०१/०३/२०२३ रोजी ३०,०००/- रुपये व दि.११/०३/२०२३ रोजी २३,०००/- रुपये असे भट याने जागेवरच घेतलेले आहेत.
त्यानंतर भटने सांगितल्याप्रमाणे तक्रारदार यांनी शिरोळे याची भेट घेतली. एरंडोल तहसिल कार्यालय येथे जमा असलेले ढंपर व दुसरे वाळू वाहतूक सुरू असलेले ढंपर असे दोन्ही ढंपर वाहनांनी धरणगाव हद्दीमधुन वाळू वाहतूकीचा व्यवसाय सुरू रहावा. त्यासंदर्भात कारवाई करु नये म्हणून शिरोळे याने प्रत्येकी ढंपरचे १५,०००/- रुपये प्रमाणे दोन्ही ढंपरचे प्रथम ३०,०००/-रुपये व तडजोडीअंती २५,०००/- रुपये लाचेची मागणी केली. तसेच याबाबत शिरोळे याने मोबाईल फोनवरून भट याच्याशी बोलणे करुन दिले. भट यानेही लाचेची मागणी करून शिरोळेकडे लाच देण्यास प्रोत्साहन दिले.
याप्रकरणी एसीबीकडे तक्रार आली. एसीबीच्या पथकाने सापळा रचला. त्यानुसार, मागणी केलेली २५,०००/-रुपये लाच रक्कम शिरोळे याने पाळधी पोलीस दुरक्षेत्राच्या बाजुस असलेल्या रस्त्यावर स्वीकारली. त्यानंतर त्याला रंगेहाथ पकडण्यात आले. तर, भट याला तहसिल कार्यालय धरणगाव येथून ताब्यात घेण्यात आले. वरील दोन्ही आरोपीतांविरुद्ध धरणगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात येत आहे.
*सापळा पर्यवेक्षण अधिकारी-*
श्री.शशिकांत पाटील, पोलिस उप अधीक्षक,ला.प्र.वि. जळगांव.
*सापळा व तपास अधिकारी-*
एन.एन.जाधव,पोलिस निरीक्षक, ला.प्र.वि. जळगांव.
*सापळा पथक-*
एस.के.बच्छाव, पोलिस निरीक्षक, ला.प्र.वि. जळगांव. स.फौ.दिनेशसिंग पाटील, पो.ना.बाळू मराठे, पो.कॉ.राकेश दुसाने.
कारवाई मदत पथक-*
स.फौ.सुरेश पाटील, पो.हे.कॉ.अशोक अहिरे, पो.हे.कॉ.सुनिल पाटील, पो.हे.कॉ.रविंद्र घुगे, म.पो.हे.कॉ.शैला धनगर, पो.ना.किशोर महाजन, पो.ना.सुनिल वानखेडे, पो.ना.ईश्वर धनगर, पो.कॉ.सचिन चाटे, पो.कॉ.प्रदिप पोळ, पो.कॉ.प्रणेश ठाकुर, पो.कॉ.अमोल सुर्यवंशी.
मार्गदर्शक-*
*1)* मा.श्रीमती शर्मिष्ठा घारगे-वालावलकर मॅडम, पोलीस अधीक्षक , ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक. मोबा.नं. 91 93719 57391
*2)* मा.श्री.एन.एस.न्याहळदे साो., अप्पर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक.
*3)* मा.श्री.नरेंद्र पवार साो., वाचक पोलीस उप अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक.
सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की, त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ संपर्क साधावा.*
अँन्टी करप्शन ब्युरो,जळगाव. अल्पबचत भवन, जिल्हाधिकारी कार्यालय आवार, जळगांव
*@ दुरध्वनी क्रं. 0257-2235477*
*@ मोबा.क्रं. 8766412529*
*@ टोल फ्रि क्रं. 1064*
Jalgaon Dharangaon ACB Raid Bribe Corruption