जळगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यात पिप्रीपंचम येथे एक धक्कादायक घटना समोर आली आहे. लहान भावानेच आपल्या मोठ्या भावाचा खून केला आहे, डोक्यात दगड टाकून ही हत्या झाल्याने गावासह तालुक्यात खळबळ उडाली आहे. या घटनेत मुखा मानकू शिंदे (४५) यांचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी संशयित लहान भाऊ पंढरी मानकू शिंदे यास अटक करण्यात आली आहे. पैसे दिले नाही म्हणून भावाने हे कृत्य केले.
मुक्ताईनगर तालुक्यातील पूर्णाड वस्ती येथे मुखा मानकु शिंदे हे आपल्या कुटुंबियासह वास्तव्यास आहे. येथे लहान भाऊ पंढरी शिंदे हा गेल्या काही दिवसांपासून मुखा शिंदे यांच्याकडे पैसे मागत होता. मात्र पैसे न दिल्याने लहान भावाला प्रचंड राग आला. त्यानंतर त्याने मोठया भावाबरोबर शेतात वाद घातला. हा वाद सोडवण्यासाठी गावातील नागरिकांनी मध्यस्थी केली.
पण, या मध्यस्तीचा काही उपयोग झाला नाही. या भांडणात पंढरी शिंदे यांनी मुखा शिंदे यांच्या डोक्यात दगड टाकला. यात मोठा भाऊ गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. त्यानंतर मुंबईच्या मोठ्या हॅास्पिटमध्ये नेत असतांना मुखा मानकू शिंदे (४५) यांचा मृत्यू झाला.
Jalgaon Crime Younger Brother Murder Elder Brother
Muktainagar Rural District Family Police Arrest