इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
जळगाव जिल्ह्यातील धरणगाव येथे दोन सख्ख्या बहिणीवर अत्याचार झाल्या प्रकरणी बाल लैंगिक अत्याचार अधिनियम कायद्यानुसार संशयित आरोपी विनोद बारेला याच्या विरोधात गुन्हा दाखल करुन त्याला गजाआड करण्यात आले आहे.
११ आणि १३ वर्षीय अल्पवयीन सख्ख्या बहिणींवर १० सप्टेंबर ते ११ सप्टेंबरच्या दरम्यान या नराधमाने दोन वेळा अत्याचार केल्याचे समोर आले आहे. या घटनेमुळे जळगाव जिल्हा हादरला आहे.
या घटनेबाबत मिळालेली माहिती अशी की, आरोपी बारेला याने अत्याचार केल्यानंतर घरात कुणाला सांगितले तर दोघांना मारून टाकण्याची धमकी दिली. पण, पीडित मुलींनी हा प्रकार तिच्या आईला सांगितला. त्यानंतर तिच्या आईने थेट धरणगाव पोलीस ठाण्यात धाव घेतली व संशयित आरोपी विनोद बारेला याच्या विरोधात तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करुन अटक केली.