जळगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पतीच्या लग्नापूर्वी असलेल्या प्रेयसीच्या धमकी विरोधात पत्नीने महिलेविरुध्द फिर्याद दाखल केली आहे. या तक्रारीवरुन या प्रेयसीविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लग्नापूर्वी पतीचे या महिलेची प्रेमसंबंध होते. त्यामुळे प्रेयसीने घरी येऊन तुझ्या पतीला माझ्याकडे पाठव नाहीतर बलात्काराचा गुन्हा दाखल करेन अशी धमकी पत्नीला दिल्यामुळे तीने थेट पोलिस ठाण्यात जाऊन ही तक्रार दाखल केली.
ही प्रेयसी माझ्या पतीला वारंवार फोन करत होती. त्यामुळे तिचा नंबर ब्लॅाक केला. त्यानंतर ती दुसऱ्या क्रमांकावरून संपर्क साधत होती. असे पत्नीने फिर्यादीत म्हटले आहे. या तक्रारीत म्हटले आहे की, १४ जुलैला ही महिला आमच्या घरी पोहचली व तुझा पती कोठे आहे असे विचारले. त्याला माझ्याकडे पाठव, नाहीतर त्याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करेल. त्याची नोकरीही खाऊन टाकेन, तुमची बदनामी करेल, अशी धमकी दिली. यावेळी या महिलेने मला पाच लाख रुपये द्या अशी मागणी करुन मला मारहाण केल्याचे म्हटले आहे.